आमच्याकडचे बहुतांश लोक लढायला तयार, शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत, रोहित पवारांची स्पष्टोक्ती

रोहित पवार आणि शरद पवार: शरद पवार हे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिले आहे. दिल्लीत अलीकडेच प्रफुल पटेल (Praful Patel) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, रोहित पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

यावेळी त्यांनी शरद पवार हे एनडीएसोबत जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले. युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडला आहे. सुप्रिया सुळे या अमित शाह यांना भेटल्या. 10 ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे-सारंग लखानी  यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत. शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत. आमच्याकडचे बहुतांश आमदार-खासदार लढाईला तयार आहेत. मी लोकांसोबत, विचारासोबत राहिलो आहे. त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे. एनडीए सोबत मी जाणार नाही, असे रोहित पवार यांनी ठणकावून सांगितले.

Rohit Pawar on paper leak: ज्या राज्यांमध्ये स्वत:चं सरकार नाही, तिकडे भाजप आंदोलन करत आहे: रोहित पवार

सीईटी सेलचा मुद्दा आमच्याकडे देखील आला आहे. भाजप सरकार राज्यात आल्यापासून वेगवेगळ्या विभागाचे पेपर फुटत आहेत. जर सीईटीचा पेपर सुद्धा फुटत असेल ते गंभीर आहे. भाजपकडून ज्या राज्यात भाजप सरकार नाही, तिथे पेपर फुटला तर भाजप आंदोलन करत आहे. माझं म्हणणं आहे त्यांनी महाराष्ट्रात आंदोलन करावं.  गृहखात्याकडून पेपर फुटला नाही असं सांगत असतील तर त्यांनी लक्षात घ्यावे. आमच्याकडे पुरावे आहेत. त्यासंदर्भात आम्ही गृहखात्याला कागदपत्रे दिली आहेत. पुरावे मिळाले नाहीत,  आधीच काहीच झालं नाही, असे सरकारकडून सांगितले जात आहे. सीईटी परीक्षेबाबत आक्षेप असणाऱ्या विद्यार्थांनी माहिती दिली आहे. पुरावे गोळा करत आहोत. तोपर्यंत काही बोलणार नाही, असे रोहित पवार म्हणाले.

आणखी वाचा

NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?

Comments are closed.