50 गुंतवणूकदारांना 1 कोटी 32 लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार एजाज सलाटला मुंबईत अटक, ‘बाबा ट्रेडिंग’ व एफएमसीजी कंपनीत वर्षभरात तिप्पट परताव्याचे आमिष

एफएमसीजी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षभरात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून शिक्षकासह तब्बल ५० जणांची १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला जालना आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वांद्रे येथून अटक केली आहे. मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

आरोपींनी मार्केटिंग क्षेत्रात ‘बाबा ट्रेडिंग’ या नावाने व्यवसाय सुरू केला होता. तसेच बाबा ट्रेडिंग व एफए‌मसीजी कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षभरात तीनपट परतावा मिळेल, असे आकर्षक आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. मात्र, मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाल्यानंतर आरोपी पसार झाले.

शेरसवारनगर येथील तक्रारदार मोहम्मद फिरोज अब्दुल सत्तार हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्यासह त्यांचे भाऊ आणि परिचित अशा सुमारे ५० गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखंकडे सोपविण्यात आला.

या प्रकरणात यापूवी वसीम अहमद अब्दुल गफार (रा. इतवार गल्ली, कचोरी रोड, जुना जालना) आगि मोहम्मद युनुन अहमद मोहम्मद सलीम (रा. इतवार गल्ली, कचचेरी रोड, जुना जालना) या दोन अरोपींना ७ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रकार मोहम्मद एजाज मोहम्मद रफिक सलाट हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. विशेष म्हणजे तो मोबाईल फोनचा बापर करीत नसल्याने पोलिसांसमोर त्याचा रोध घेण्याचे आव्हान होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून त्याचा शोब सुरू ठेवला. अखेर आरोपी मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईतील निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथील सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कदम, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे व त्यांच्या पथकाची मदत घेऊन आरोपी एजल सलाट याला रात्री एक बाउता अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जालना येथे आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढे त्याला एनपीआयडी विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता

आरोपींनी वर्षभरात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेतल्याने या प्रकरणात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. बाबा ट्रेडिंग किंवा संबंधित एफएमजीसी कंपनीमध्ये आरोपींच्या आमिषाला बळी पडून ज्यांनी गुंतवणूक केली असेल, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथे येऊन तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साठी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे तसेच महिला पोलीस अंमलदार मंदा नाटकर यांनी ही कारवाई केली.

Comments are closed.