भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, ‘असा’ सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक गुन्हा: मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांचा पीए (PA) असल्याचे सांगून 71 लाख 50 हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश धोंडू कदम या भामट्यास गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. लासलगाव (Lasalgaon) परिसरातील विंचूर फाटा (Vinchur Phata) येथे सापळा रचून गुंडाविरोधी पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सन 2023 मध्ये संशयित प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्च्याकडून वेळोवेळी 71 लाख 50 हजार रुपये उकळले.

गुन्हा दाखल झाल्यापासून फरार

याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात (दि.6) फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला दिले होते. त्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित प्रकाश धोंडू कदम (रा. बदलापूर, जि. ठाणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. संशयित आपल्या घरी न राहता कोल्हापूर, सोलापूरअहिल्यानगर व संभाजीनगर आदी जिल्ह्यांत लपून फिरत होता.

सापळा रचून संशयितास घेतले ताब्यात

संशयित हा फिरता असल्याने त्याची माहिती काढणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली. संशयित लासलगाव, निफाड या भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तत्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले. संशयित हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात संशयिताच्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून त्याची माहिती घेऊन विंचूरफाटा, लासलगाव, नाशिक येथे सापळा रचून संशयित प्रकाश धोंडू कदम यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Swargate Bus Depot Case: दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये…; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?

Prashant Koratkar : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर सापडेना, पण आता नागपूरमध्येही गुन्हा दाखल

अधिक पाहा..

Comments are closed.