भोंदू चेतन बाबाचा चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; दाताने उचलणाऱ्या भोंदू बाबावर अखेर गुन्हे दाखल
अकोला क्राईम न्यूज : अकोल्यात अंधश्रद्धेचा भयानक प्रकार समोर आलाहे. यात अखेआणि चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या भोंदू चेतन महाराजावआणि गुन्हा दाखल झालाय. अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात काल (23 एप्रिल) रात्री उशिरा महिला व बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल झालीहे. निंबा गावात अंधश्रद्धेचा अंगावर शहारे आणणारा प्रकार समोर आला होता. गावातील चेतन महाराज मुळे या भोंदू बाबाने लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः लहान मुलांना दाताने उचलले, आणि गरागरा फिरवले होते. याचे व्हिडीओ प्रचंड वायरल झाले. उपचाराच्या नावाखाली अक्षरशः भोंदू चेतन बाबाचा लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरु होताय. या निंबा गावात 4 महाराजांचे दरबार भरतायेत. लहान मुलांना दाताने उचलले, खिळ्यांच्या आसनावर बसणे यासोबतच अनेक अघोरी प्रकार हा भोंदू महाराज करतोय.
दरम्यान, या प्रकरणी अखेर कलम 125 भारतीय न्यायसंहीता, कलम 75 बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 (बालकांवरील क्रुरता) तसेच कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा 2013 (अंधश्रद्धा पसरविणे व अमानुष कृत्य) अशा कलमान्वये गुन्हे दाखल झालेये.
Akola : लावणीच्या नावाखाली होत असलेल्या अश्लीलतेला थांबवण्यासाठी वेगळे सेन्सॉर बोर्ड स्थापन करा; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्राच्या समृद्ध लावणी कलेच्या जतनासाठी आता ठोस पावले उचलण्याची मागणी पुढे येतीये. लावणीच्या नावाखाली वाढत्या अश्लील डीजे सादरीकरणांवर नियंत्रण आणण्यासाठी सेन्सॉर मंडळ स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने केलीये. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्राची ओळख असलेली पारंपारिक लावणी कला आज धोक्यात आल्याची चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आलीये. तमाशा आणि लावणी या लोककलेने अनेक वर्षे राज्याची सांस्कृतिक परंपरा जपली. लिलाताई गांधी, मधू कंबिकार, उषा चव्हाण, सुरेखा पुणेकर यांसारख्या कलाकारांनी लावणीला मानाचा दर्जा मिळवून दिला. मात्र सध्या “डीजे डान्स” आणि “स्टेज शो”च्या नावाखाली अश्लील सादरीकरणे मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेय. या पार्श्वभूमीवर सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
पारंपारिक लावणी जपण्यासाठी स्वतंत्र सेन्सॉर मंडळ स्थापन करणे, अश्लील हालचाली आणि अयोग्य वेशभूषेवर बंदी घालणे, तसेच स्टेज सादरीकरणासाठी कडक नियम लागू करणे, या प्रमुख मागण्या आहेत. तसेच जत्रा, वाढदिवस किंवा गावोगावी होणाऱ्या ट्रॉलीवरील नृत्य सादरीकरणांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पारंपारिक लावणीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आणि शासकीय योजना राबवण्याचीही मागणी करण्यात आलीये. दरम्यान, या मागण्यांवर राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.