अजित पवारांच्या घराबाहेरील भानामतीशी खरात कनेक्शन, 34 सेकंदात पैशांचे व्यवहार: अंजली दमानिया

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar) पुण्यातील घराबाहेर ज्या दिवशी भानामतीचा प्रकार घडला त्याच दिवशी अशोक खरातने (Ashok Kharat) एका हॉटेलमध्ये बसून पैशांचे मोठे व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. 17 जानेवारी रोजी अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार झाला आणि त्याच दिवशी अशोक खरातने 34 सेकंदात मोठे व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का याचा तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.

अंजली दमानिया यांनी माधमांशी संवाद साधताना अशोक खरात प्रकरणी अनेक आरोप केले. रुपाली चाकणकरांसोबत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे खरातसोबत संबंध असल्याचा दावा केला.

Ajit Pawar Plane Accident : दादांच्या अपघाताशी खरातचा संबंध?

अंजली दमानिया म्हणाल्या की, “27 ते 31 जानेवारी या दरम्यान समता प्रतिष्ठानमध्ये अफाट भ्रष्टाचार झाला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर 17 जानेवारी रोजी भानामतीचा प्रकार झाला होता तेव्हा अशोक खरात हा ठाण्यात आला होता. तेव्हा एका हॉटेलमध्ये फक्त 34 सेकंदात खूप मोठे पैशांचे व्यवहार झाले होते. याबाबत आता पोलिसांनी चौकशी केली पाहिजे.”

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, “27, 28 आणि 29 जानेवारी रोजी 5 कोटी 33 लाखांचे व्यवहार झाले आहेत. ⁠हे पैसे कुठून आले, कोणी आणले, कशासाठी आणले हे शोधायला पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेकडून याची चौकशी व्हायला हवी.”

कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं. आता त्या फरार आहेत. पोलिसांनी हे मुद्दाम केलं का असा संशय आहे. त्यांची चौकशी होऊ नये यासाठी काहीजण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न पडतोय, असा आरोपही यावेळी दमानिया यांनी केला.

अशोक खरात प्रकरणात बोलायला सुरू केलं तर दिवस कमी पडेल. खरातला मोठं करणारे राजकारणी आणि अधिकारी आहेत. ⁠काही राजकारणी नुसते भविष्य विचारायला गेले असतील, मात्र काही राजकारणी नक्कीच काहीतरी साध्य करायला गेले होते, असा आरोप दमानिया यांनी केला.

Anjali Damania On Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांची 22 मिनिटे चर्चा

अंजली दमानिया म्हणाल्या की, “रुपाली ⁠चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट केली. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणात मीडिया ट्रायलचा आरोप केला. पण माझाकडे रूपाली चाकणकर यांची फोन कॉल यादी आहे. यात चाकणकरांनी खरातला 177 वेळा कॉल केला आहे. ⁠एका दिवशी त्या तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होत्या. ⁠मी एसआयटीकडे चौकशीची मागणी केली आहे. खरातशी सर्वाधिक चर्चा करणाऱ्या रुपाली चाकणकर या टॉप 10 मधील दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्ती आहेत.”

अंजली दमानिया यांनी खरातशी संपर्कात असलेल्या राजकारण्यांची नावे जाहीर केली. ती खालीलप्रमाणे,

– ⁠नितीन पवार
– ⁠चंद्रकांत पाटील आणि पीए देशपांडे
– ⁠उदय सांगळे
– ⁠पद्मश्री पोपटराव पवार
– दादा भुसेंचे पा
– ⁠राहुल रोकडे, विखे पाटील यांचे पीए
एकनाथ शिंदे
– ⁠प्रभाकर काळे
– ⁠सुनील तटकरे
– ⁠जयंत पाटील
– ⁠रुपाली चाकणकर
– ⁠मुलगा सोहम चाकणकर आणि इतर

अशोक खरातच्या कॉन्टॅक्टमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी होते. त्यांची नावेही अंजली दमानिया यांनी जाहीर केली.

– ⁠दिपक लोंढे हे खरातच्या जवळचे आहेत.
– ⁠बाळासाहेब बोराडे
– ⁠नंदकिशोर  काटोरे हे डॉक्टर आहेत.
– ⁠सचिन चुंबाळे
– ⁠मंगेश नवाळे
– ⁠राहुल देशमुख
– ⁠अविनाश पोटे
– ⁠कमलाकर पोटे
– ⁠महेंद्र शेळके-पाटील

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.