पाकिस्तानी वंशाचा खेळाडू पहिल्यांदाच IPL खेळणार! दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL 2026 च्या 19व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या हंगामातून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाने इंग्लंडचाच 21 वर्षीय तरुण लेग स्पिनर रेहान अहमद याला बदली खेळाडू म्हणून ताफ्यात सामील केले आहे. रेहान पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार असून दिल्लीने त्याला 75 लाख रुपयांच्या करारासह आपल्या संघात स्थान दिले आहे.

रेहान अहमदचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी त्याचे वडील मूळचे पाकिस्तानी क्रिकेटपटू होते, जे नंतर इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. रेहानच्या टी20 कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने आतापर्यंत 97 सामन्यांत 85 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, गोलंदाजीसोबतच तो खालच्या फळीत फलंदाजी करण्यातही तरबेज आहे. त्याने टी20 मध्ये आतापर्यंत 1071 धावा केल्या असून त्याच्या समावेशामुळे दिल्लीची गोलंदाजी आणि फलंदाजीची खोली दोन्ही मजबूत होण्याची शक्यता आहे.

IPL 2026 – चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील हार्दिकच्या निर्णयवर भडकला आर अश्विन, व्हिडीओ शेअर करत केली जोरदार टीका

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम आतापर्यंत ‘कभी खुशी कभी गम’ असा राहिला आहे. दिल्लीने 6 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले असून 3 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या संघ गुणतालिकेत मधल्या स्थानावर असून प्ले-ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना आगामी सामने जिंकणे अनिवार्य आहे. दिल्लीचा पुढचा सामना 25 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे.

Comments are closed.