तिलक वर्मा अन् जेमी ओव्हरटनमध्ये जुंपली, शांत राहणाऱ्या सूर्याचाही सुटला संयम; पाहा MI vs CSK स

टिळक वर्मा आणि जेमी ओव्हरटन MI वि CSK IPL 2026 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK IPL 2026) यांच्यात गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 33व्या सामन्यात एक क्षण असा आला, ज्याने मैदानावरच तणावाची ठिणगी पेटवली. तिलक वर्मा आणि जेमी ओव्हर्टन यांच्यातील वादामुळे वातावरण चांगलेच तापले, आणि नेहमी शांत राहणारा सूर्यकुमार यादवही या वादात उतरल्याचे पाहायला मिळाले.

MI vs CSK सामन्यात हाय-व्होल्टेज राडा

ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील 10व्या षटकात घडली. ओव्हर्टनने शेवटचा चेंडू संथ गतीने टाकला, ज्यावर तिलकने मिडविकेटकडे फटका मारत एक धाव घेतली. तिलकने दोन धावांसाठी हाक दिली होती, पण सूर्यकुमार यादवने एक धाव घेणंच योग्य मानलं.

तिलक वर्मा आणि जेमी ओव्हर्टन नेमकं काय घडलं?

यानंतर अचानक ओव्हर्टन आणि तिलक यांच्यात शब्दयुद्ध सुरू झालं. ओव्हर्टन चेंडू घेण्यासाठी स्टंप्सजवळ आले असताना तिलक चिडलेले दिसले. त्यांचा आरोप होता की ओव्हर्टन त्यांच्या नजरेसमोर उभे राहिल्यामुळे त्यांना फील्डर कुठे आहे हे दिसत नव्हतं. स्टंप माइकवर तिलकचा आवाज स्पष्ट ऐकू आला, “मला फील्डर दिसत नाहीये.”

तिलकच्या या प्रतिक्रियेवर ओव्हर्टननेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. दोघेही एकमेकांकडे हातवारे करत पुढे सरसावले. याचवेळी सूर्यकुमार यादवने हस्तक्षेप करत आपल्या सहकाऱ्याच्या समर्थनार्थ उभं राहत वादात उडी घेतली. क्षणभर परिस्थिती अधिकच चिघळल्यासारखी वाटली. मात्र, मैदानी पंचांनी तातडीने हस्तक्षेप करत तिघांनाही वेगळं केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळाने सामना पुन्हा सुरू झाला. ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सामन्यातील हा प्रसंग सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाला.

सामन्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालेलं दिसलं. दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करत खेळाडूवृत्तीचं उत्तम उदाहरण दाखवलं. तिलक वर्मा आणि जेमी ओव्हर्टन हेही एकमेकांना मिठी मारताना दिसले. सामन्याचा निकाल मात्र पूर्णपणे चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने गेला. सीएसकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव 19 षटकांत 104 धावांवर आटोपला. संजू सॅमसनला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर घोषित करण्यात आलं.

हे ही वाचा –

MI vs CSK सामन्यानंतर आयपीएलमध्ये नवा वाद पेटला; मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप, शेवटी कोचला यावं लागलं समोर, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.