महिला पोलिसाशी अश्लील बोलणं भोवलं; रायगडमध्ये दोन पोलिसांचं थेट निलंबन, नेमकं काय घडलं?

रायगड क्राईम न्यूज: महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी नेमण्यात आलेल्या दक्षता कमिटीच्या महिला सदस्यासोबतच अश्लील वर्तन करणे रायगडमधील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. पेण आणि खोपोली पोलीस दलातील या दोन कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन करून महिलेशी अश्लील संभाषण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची (Suspension) कारवाई केली आहे.

Raigad Crime News: नेमके प्रकरण काय?

निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे प्रकाश कोकरे (पेण) आणि नितीन मोहिते (खोपोली) अशी आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता कमिटीच्या एका महिला सदस्यासोबत या दोघांनीही अत्यंत खालच्या थराचे वर्तन केले. या दोघांनीही मद्यधुंद अवस्थेत संबंधित महिलेला मोबाईलवर फोन करून अश्लील संभाषण केले.

Raigad Crime News: व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजचा भडिमार

केवळ फोनच नव्हे, तर एका व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून या महिलेला विनाकारण मेसेज पाठवून त्रास देण्याचा प्रकारही समोर आला आहे. महिलेने या त्रासाला कंटाळून अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले होते.

Raigad Crime News: पोलीस अधीक्षकांचा दणका

प्राथमिक चौकशीत या दोन्ही पोलिसांकडून कर्तव्यात कसूर आणि गैरवर्तन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी प्रकाश कोकरे आणि नितीन मोहिते या दोघांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले. खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या आणि महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे रायगड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: ‘पैसे देऊ शकत नसशील, तर तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव’, सावकाराची संतापजनक मागणी, बापाने थेट काटा काढला; नागपूर हादरलं!

Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरातचे वकील कोर्टात संतापले, म्हणाले, एसआयटी सारखं तेच पाणी आणि पेढे करत बसलेय, न्यायाधीशांचा महत्त्वाचा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.