‘गणेश नाईकांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की, मी यांची मस्ती उतरवणार, पक्षालाही…’, मंदा म्
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विषयक सुविधांच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आल्यामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज महापालिकेच्या विविध आरोग्य प्रकल्पांचा उद्घाटन सोहळा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडत आहे. एकनाथ शिंदे (मराठी) हे ठाणे जिल्ह्याचे तर गणेश नाईक (Ganesh Naik) हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; तरीही नवी मुंबईतील कार्यक्रमाचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते सुरू असल्याने वाद पेटला आहे. एकीकडे कार्यक्रमस्थळी गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या उपस्थितीत सोहळा सुरू असताना, बाहेर मात्र संतप्त शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. तर भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) यांनी देखील संताप व्यक्त करत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. या संपूर्ण प्रकरणावर भाजप आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली असून, गणेश नाईक यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत या कार्यक्रमावर थेट बहिष्कार टाकला आहे.(BJP MLA Manda Mhatre)
माध्यमांशी बोलताना आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या, “नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात ज्या मातांना दूध येत नाही, त्यांच्या गरीब मुलांसाठी संपूर्ण नवी मुंबईत एक साखळी सुरू करून ‘मिल्क बँक’ (मिल्क अपे) सुरू करण्यात येत आहे. तसेच इथे जे डायलिसिस मशीन दिले आहे, ते कंत्राटदाराने (कॉन्ट्रॅक्टरने) दिले आहे, कोणत्याही मंत्र्याने दिलेले नाही. महानगरपालिकेने पहिली निमंत्रण पत्रिका व्यवस्थित छापली होती. मात्र, दुसऱ्या पत्रिकेतून थेट एकनाथ शिंदेजींचे नाव गायब करण्यात आले आणि तिथे ‘आमदार गणेश नाईक यांनी काम केले’ असे लिहिण्यात आले.”
Manda Mhatre : “आमदार निधी बेलापूरमध्ये का वापरता?” मंदा म्हात्रेंचा सवाल
त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्यक्षात कृतीमध्ये काहीही नाही. सिव्हिल कामासाठी त्यांनी काही आमदार निधी दिलेला आहे. जी कामे ऐरोळी मतदारसंघात करायला पाहिजेत, ती कामे ते बेलापूरमध्ये येऊन करत आहेत. ऐरोळीतील एवढे प्रश्न आणि लोक माझ्याकडे येतात; कोणी तिथे निर्मळा केंद्र मागतंय, तर कोणी व्यायामशाळा मागतंय. तिथल्या लोकांना साध्या रेशन कार्डच्या कामासाठीही यांची माणसं भेटत नाहीत. घणसोली, कोपरखैरणे, ऐरोळी या सर्व भागांतील लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडे कामांचे गट्टेच्या गट्टे पडले आहेत.”
आपला अपमान केला जात असल्याचा आरोप करत म्हात्रे म्हणाल्या, “२००४ मध्ये मी आमदार असताना जेव्हा एक जेटी (Jetty) बांधली होती, तेव्हा यांनी मला तिथे येऊन सांगितले होते की, ‘मी इथला आमदार आहे, तुम्ही मला न विचारता कशी काय कामे करता?’ मग हे स्वतःचे वाक्य ते आता विसरले का? मी पण आता इथली आमदार आहे, मला कुठल्या विश्वासात घेतले जाते? एल अँड टी (L&T) कंपनीच्या सीएसआर फंडाधून (CSR Fund) मी स्वतः वर्षभरापूर्वी दोन डायलिसिस मशीन्स इथे आणल्या होत्या, कारण लोकांना डायलिसिससाठी पैसे द्यावे लागतात. आता जे डायलिसिस सुरू केले आहे ते पैशानेच आहे, फुकट काहीही नाही. मग महापालिकेचा एवढा पैसा जातो कुठे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Manda Mhatre : “मी आता कंटाळलेय, पक्षालाही सांगून टाकलंय!”
क्रेडिट घेण्याच्या वैभव नाईक यांच्या राजकारणावर तोफ डागत त्या म्हणाल्या, “तुम्ही एवढी मोठी मोठी नावे लावून स्वतःची प्रसिद्धी करता की तुमच्यामुळे हे झाले. मी विचारले का की डायलिसिस मशिन्स कोणी दिल्या आणि कशा दिल्या? त्याचे किती पैसे लावणार? म्हणजे फुकटचे क्रेडिट घ्यायचे! मी आता या सर्व प्रकाराला कंटाळले असून आता बस झाले. मी पक्षालाही याबाबत स्पष्टपणे सांगून टाकले आहे. आता पुढचे जे काही पाऊल उचलायचे आहे, ते मी स्वतः उचलणार आहे. संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मी एकमेव महिला भाजप आमदार आहे आणि सलग तीन वेळा निवडून आलेले आहे. मी इतर आमदारांसारखी गॅप घेतलेली नाही किंवा एकदा पडले आणि दुसऱ्यांदा आले असे नाही; लोकांनी माझे काम बघून मला सलग निवडून दिले आहे, तरीही माझा प्रत्येक वेळी अपमान केला जातो”, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“शिंदे साहेब पालकमंत्री आहेत, त्यांचा अपमान होतोय ते त्यांचं चाललेलं आहे. पण मी तर इथली आमदार आहे ना? मी इथे काम करते, लोकांना वेळ देते, सगळी उपकरणे मी पुरवते. मग माझ्या सीबीडीमधील दोन्ही मशीन्स तिथे पाठवून दिल्या आणि तिथले उद्घाटन इथेच करणार आहेत, म्हणूनच मी या संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे,” अशा कडक शब्दांत मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर आपला प्रचंड रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर म्हात्रे पुढे बोलताना म्हणाल्या, गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी मला धक्काबुक्की केली. कार्यक्रमात गेले असता गेले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मी येथील स्थानिक आमदार असताना मला सतत डावलेले जात आहे. यांची मस्ती मी उतरणार आहे. माझ्या मतदार संघात हे घुसखोरी करीत असतील तर मी ही ऐरोली मतदार संघात घुसून यापुढे मी शांत बसणार नाही, असा इशारा म्हात्रेंनी दिला आहे.
मराठी VS Ganesh Naik : नेमकं काय आहे प्रकरण?
नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. नवी मुबंईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकर्पण सोहळा आहे. या कार्यक्रमात आमदार व वनमंत्री गणेश यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. मात्र ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नवी मुबंई पालिकेच्या पत्रिकेत नाही. नवी मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेल्याच्या चर्चा आहेत.
America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Comments are closed.