जितेंद्र आव्हाडांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल
जितेंद्र वर सुरेश धस: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची (Santosh Deshmukh murder case) बाजू मी जशी मांडली, तेवढ्याच प्रखरतेने सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणातही बाजू मांडल्याचे मत भाजप आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात संबधित पोलिसांना रिमू फ्रॅाम सर्विस करा अशी मागणी देखील मीच केल्याचे सुरेश धस म्हणाले. आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांना फक्त रॉकेल टाकून पेटवायचाच धंदा जमतो का? अशी टीका देखील धस यांनी केली. प्रकरण तिथल्या तिथे मिटलं त्यामुळं त्यांना पोटशूळ उठल्याचे धस म्हणाले.
सर्व मोर्चात मी दोन्ही बाजूने सारखाच बोललो असल्याचे धस म्हणाले. मोर्चेकरांच्या संमतीनं मोर्चा मिटवणं योग्य की अयोग्य? असेही धस म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकवून पेटवायचाच धंदा जमतो का? महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ नीट राहिलं न पाहिजे का? असेही धस म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मुंबईला येणारा लाँग मार्च नाशिकमध्ये थांबवल्यानं जितेंद्र आव्हाडांना पोटशूळ उठलाय का? असा सवाल देखील धस यांनी केला. आम्हीही फुले शाहू आंबेडकर विचारांचे आहोत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. माझं वाक्य मोडून तोडून दाखवण्यात आलं आहे. मी म्हटलं होतं व्हिडिओत दिसत असलेल्यांवर कारवाई करा असेही धस म्हणाले.
जितेंद्र आव्हाड मोर्चात होते पण ते सोमनाथ सूर्यवंशीवर बोललेही नाहीत
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मोर्चात होते पण ते सोमनाथवर बोललेही नाहीत असेही सुरेश धस म्हणाले. धाराशिवला आले नाहीत फक्त बीडला आले. मी पहिल्या दिवसांपासून मोर्चेकऱ्यांच्या संपर्कात होतो. आम्ही दररोज विनंती करत होतो क्लेशकारक आंदोलन थांबवा. यात न्यायालयीन चौकशी लावलेली आहे असेही धस म्हणाले. आव्हाड यांना आवाहन आहे की, दोन्ही प्रकरणात जराही काही वाटत असेल तर ठाण्यात किंवा मुंबईत लाखोचा मोर्चा काढा असेही धस म्हणाले. आव्हाड अक्षय शिंदेंच्या प्रकरणात गुणगाण गात होते. धाराशिवच्या नितीन बिक्कड याने त्यांना मदत केली, मोबाइल सोडून पळाले, विष्णू चाटे वेगळ्या पद्धतीने पळून गेला. बीड एसआयटी व परभणीचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. 0
महादेव मुंडे प्रकरणात पहिल्या 15 दिवस तपासचं झाला नाही. या चौकशीनंतर 12 ते 15 लोकं फरार आहेत असेही धस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
सुरेश धस यांनी परभणी लाँग मार्चमध्ये बोलताना, मोठं मन करा आणि पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्र्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. आव्हाडांनी सुरेश धसांचा व्हिडीओ शेअर केला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफ करा असं तुम्ही कसं म्हणू शकता असा प्रश्न विचारला होता.
https://www.youtube.com/watch?v=jqamrzci6ge
महत्वाच्या बातम्या:
माझी क्लिप तोडून-मोडून दाखवली, आव्हाडांनी मला शहाणपणा शिकवू नये; सुरेश धसांचा पलटवार
अधिक पाहा..
Comments are closed.