कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या
अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मुंबई महापालिकेच्या (Election) निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणाच आज केली आहे. त्यानंतर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनीही कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत (मनसे) जायचं नाही, अशी काँग्रेसची, वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाष्य केलं. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते आघाडी करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, असे थोरात यांनी म्हटलं. दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाशिकच्या काँग्रेस शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी, संगमनेर शहरातील कार्यालयात संबंधित पदाधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर केले आहेत. मी नगर आणि नाशिक वेगळं मानत नाही, त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात. नाशिक येथे आज झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधींनी त्यांना बोलावलं होतं, तिथे कोण कोण येणार हे यांना देखील माहिती नव्हतं. मात्र, आमचं धोरण निश्चित आहे, कोणत्याही परिस्थितीत मनसे बरोबर जायचं नाही. त्यामुळे बैठकीला कुठे एकत्र बसले तर गैरसमज करण्याचं कारण नाही, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नाशिकमधील बैठकीवरुन होत असलेल्या राजकीय भूमिकेवर स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच, मीडियाने वेगळा अर्थ घेऊ नये, हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रांतिक अध्यक्ष आहेत, आम्ही एकत्र काम करत आलो आणि यापुढेही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दोन राष्ट्रवादी एकत्र, आमचं काहीही म्हणणं नाही
दरम्यान, चंदगड येथे दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यासंदर्भात हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवरुन बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, जो राष्ट्रहिताचा विचार करतो तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल, असं मला वाटतं. त्यामुळे, जर भाजपला दूर ठेवण्यासाठी ते असं करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, अशी भूमिका थोरात यांनी मांडली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.