पुण्यात तिसरी संतापजनक घटना, नसरापूर, म्हाळुंगेनंतर आता चाकणमध्ये 11 वर्षीय मुलीचा विनयभंग, नरा
गुन्हे बातम्या ठेवा: पुणे (Pune) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. नसरापूर आणि म्हाळुंगे येथील धक्कादायक घटना ताज्या असतानाच, आता चाकण जवळील बिरदवडी येथे 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी 32 वर्षीय परप्रांतीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.
Pune Crime News: नेमकी घटना काय?
शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडित 11 वर्षीय मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. यावेळी मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा (वय 32) याने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुकलीने अत्यंत धैर्याने तेथून पळ काढल्याने ती बजावली. मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर, वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
Pune Crime News: आरोपीला अटक आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा
घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तर चाकण पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून आरोपी अरुण मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Pune Crime News : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे
पुणे जिल्ह्यात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भोर तालुक्याच्या नसरापूर येथे 1 मे रोजी 4 वर्षांच्या मुलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. या विरोधात शनिवारी रात्री नवले पुलावर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्यात आले. तर चाकणच्याच म्हाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 3 वर्षांच्या चिमुरड्यावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बिहारमधील एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. आता पुन्हा चाकणमध्येच अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.