उद्धव ठाकरेंना दे धक्का, एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केलेल्या माजी महापौर दत्ता दळवींनी साथ सोडली

मुंबई : महाराष्ट्रतील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी (Datta dalavi) यांनी आपल्या शिवसेनेतील पदांचा राजीनामा पक्षप्रमुख उधव ठाकरे (उधव विचार करा) यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे, शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो. मी माझ्या घरगुती कारणास्तव शिवसेनेतील माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे दळवी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, लवकरच दळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यातच, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटात इनकमिंग होत असून मुंबईत शिंदेंकडून ठाकरेंना पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ईशान्य मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाला आणि आमदार सुनील राऊत यांच्या किल्ल्याला सुरुंग लागल्याची चर्चा या पक्षप्रवेशान होत आहे. विशेष म्हणजे दत्ता दळवी यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देखील

दळवींचा आजच शिंदे गटात प्रवेश

विशेष म्हणजे आजच संध्याकाळी मुक्तागिरी बंगल्यावर दत्ता दळवी यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत ईशान्य मुंबईतील अनेक शाखाप्रमुख आणि पदाधिकारी देखील प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. संभाजी नगर येथील काही महत्वाचे नेते देखील आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मुंबईतील उबाठा शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक तसेच काही शाखाप्रमुख व मुरबाड तालुक्यातील उबाठाचे काही पदाधिकारी, विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे दीड वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यामुळे दळवी यांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.

कोण आहेत दत्ता दळवी?

दत्ता दळवी हे बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असून मुंबईचे माजी महापौर राहिले आहेत. ईशान्य मुंबईत त्यांचा दबदबा असून शिवसेना पक्षातही त्यांना उपनेते पदाचा मान होता. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यामुळे दळवी यांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी 2005 ते 2007 या कालावधीत मुंबईचे महापौर होते. शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दळवी प्रसिद्ध आहे. ईशान्य मुंबईत दळवी यांचं प्राबल्य आहे. शिवसेनेत विभाग क्रमांक 7 चे विभागप्रमुख म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. 2018 मध्ये शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी गटबाजी केल्यामुळे दळवी यांना ईशान्य मुंबईच्या तत्कालीन विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता. त्यावेळी दळवी यांनी राजीनामा स्वतः दिला की उद्धव ठाकरे यांनी त्यांना द्यायला लावला अशी चर्चा सुरु होती. या प्रकरणामुळे दळवी चर्चेत आले होते.

हेही वाचा

ST महामंडळाची श्वेतपत्रिका, मेडिक्लेम योजना, हॉटेल थांब्यासाठी नवं धोरण; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

अधिक पाहा..

Comments are closed.