त्याला सोडलं जाणार नाही, मी पोलीस आयुक्ताशी बोललोय; पुतळाप्रकरणी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

ठाणे : मुंबईच्या (Mumbai) दादर येथील शिवाजी पार्कमध्ये असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न समाजकंटकाकडून करण्यात आलाय. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात असून आज सकाळी ही घटना उघडकीस आल्याने शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा लाल रंग नेमका कोणी टाकला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवाजी पार्कमध्ये जाऊन मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी केली. तसेच, ही घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी तो अज्ञात व्यक्ती शोधावा, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम (योगेश कदम) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री श्रीमंत पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते आज खुनी गावात पार पडला. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घातले आहे, ही बाब गांभीर्याने घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. कोणत्याही परिस्थिती त्या समाजकंटकाला सोडले जाणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितले?

कडक कारवाईचे आदेश – योगेश कदम

मुंबईमधील घटनेचा कोणीही समर्थन करत नाही, आई साहेबांबाबत प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आदर आहे, ही अतिशय निंदनीय घटना आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कायदेशीर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. कारण आणि उद्देश काय आहे, यावर कारवाई करण्यात येईल. आज सकाळी सव्वा 6 ते 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे, कुठल्या उद्देशाने हे कृत्य केलं आहे, तो ताब्यात आल्यानंतरच कळेल, असेही गृहराज्यमंत्र्यांनी म्हटलं?

शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रकार नसेल ना – भास्कर जाधव

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्याची विटंबना करण्याचा नालायक प्रयत्न केला गेला, ज्यांना उभा महाराष्ट्र आई म्हणून ओळखतो. मीनाताई ठाकरे यांनी आपल्या संस्काराने मायेने आणि संस्कृतीने तसेच एका नेत्याच्या पत्नी असून देखील सोज्वळ मायेने सगळ्यांना जोपासले होते. उत्तम गृहिणी, आदर्श पत्नी, माता कशी असावी याचे सुद्धा आपल्या वागण्याने-बोलण्याने आणि त्याचबरोबर संयमी कृतीने दाखवून दिले. आपली ओळख आई म्हणून निर्माण केली. ज्या कोणी नालायक व्यक्तीने हा प्रयत्न केला, त्यांना एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही माँसाहेब यांच्या पुतळ्याचा कुठेतरी अवमान करण्याचा प्रयत्न कराल. पण, माँसाहेबांच्या जीवनावर, माऊली म्हणून त्यांची संस्कृती, सभ्यता यावर डाग लावता येणार नाही. मला माहित आहे, एका पक्षाचे नेते म्हणाले होते की, आम्ही शिवसेनाभवन सुद्धा तोडू. काही नेते जहाल भाषणे पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. त्यातलाच हा प्रकार शिवसैनिकाना चिडवण्याचा नसेल ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आजच प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे. एक थोर समाजसुधारक, जे संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह झाला पाहिजे अशा लढ्यात होते, त्यांची जयंती आहे. अशावेळी हा घृणास्पद प्रकार घडला, याचा मी निषेध करतो, असेही जाधव यांनी म्हटले. पोलीस खाते कुठे गेले, कुठे गेले सुरक्षा यंत्रणा? लवकरात लवकर तपास करा? जाणीवपूर्वक कोणी करत नसेल ना, जर करत नसेल तर तात्काळ सर्व समोर आले पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.

हेही वाचा

मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; उद्धव ठाकरे म्हणाले, हे दोघेच करु शकतात, ते म्हणजे…

आणखी वाचा

Comments are closed.