सातारा सांगलीसाठी जयंत पाटील यांच्या निष्ठावंतला लॉटरी, उद्या अर्ज दाखल करणार

सांगली: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या 17 जागांमध्ये सातारा सांगलीच्या जागेचा समावेश आहे. मविआकडून या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील बाळासाहेब पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या म्हणजेच 1 जून शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीनं सर्व जागा लढवण्याची भूमिका घेतली होती. त्या जागा वाटपात सातारा सांगलीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आली आहे.

जयंत पाटील यांचा विश्वासू नेता रिंगणात

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रवादी कडून  पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. सातारा आणि सागंली स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी अगोदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

महायुतीचा उमेदवार कोण असणार?

महायुतीत जागा वाटपात साताऱ्याची जागा भाजपकडून लढवली जाणार आहे. या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजपमध्ये साताऱ्यात सुनील काटकर, धैर्यशील कदम, मकरंद देशपांडे आणि शेखर गोरे यांची नावं आघाडीवर आहेत.

शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा अर्ज

सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो कायम ठेवण्यासाठीच अर्ज केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं सातारा सांगलीच्या जागेवर तानाजीराव पाटील यांचा अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास निवडणूक तिरंगी होऊ शकते.

सातारा सांगली मतदारसंघातील पक्षीय बलाबल

सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील मतदारांची संख्या 895 इतकी आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून 315 मतदार भाजपकडे आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असून त्यांचे 205 मतदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे 119 मतदार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकेडे 111,काँग्रेसकडे 73 आणि अपक्ष 30 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 1 मतदार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.