महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर  समाधान मानावे लागणार आहे. (Mahayuti Vidhan Parishad Election 2026) तर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना कशा पद्धतीने हा तिढा सुटला? याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषद निवडणूक 2026: जागांवर दावा असताना कशा पद्धतीने हा तिढा सुटला?

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित बघता सतरा विधान परिषदेच्या जागांपैकी 14 विधान परिषदेच्या जागेवर भाजपचे वर्चस्व होतं.
* भाजप 14 जागांवर वर्चस्व असताना सुद्धा आपल्या महायुतीतील मित्र पक्षांना सामावून घेऊन महायुतीतच निवडणूक लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला.
* शिवसेनेने आपली ताकद असलेल्या आणि पारंपारिक जागा असलेल्या सहा जागांवर दावा केला होता… मात्र अंतिम चर्चेमध्ये सहापैकी चारच जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले.
* रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा दावा ठोकण्यात आला होता आणि शिवसेनेला सुद्धा ती जागा मिळावी यासाठी पक्ष आगरी होता… मात्र त्या ठिकाणी रायगड पालकमंत्री पद शिवसेनेला आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला अशा प्रकारचा प्रस्तावावर चर्चा होऊन अंतिम तोडगा निघाल्याची माहिती आहे.
* नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर- जालना या दोन जागांपैकी एक जागा ही भाजपला हवी असल्याचं नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला… मात्र या दोन्ही जागा शिवसेनेच्या पारंपारिक जागा असल्याने या जागा सोडण्यात शिवसेनेने नकार दिला.
* अंतिम टप्प्यात झालेल्या बैठकीमध्ये नाशिकची जागा शिवसेना पक्षाला आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा भाजपला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
* दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे त्यासोबतच परभणी हिंगोली या दोन विधान परिषदेच्या जागेवर आकडेवारीनुसार वर्चस्व पाहायला मिळते… त्यामुळे परभणी हिंगोली, पुणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात यासाठी पक्ष आग्रही होता.
* पुण्याच्या जागे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती… मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणाऱ्या दोन जागांमध्ये पुण्याची जागा त्यासोबतच कोकणातली जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडली.
* परभणीच्या जागेवरून अंतिम टप्प्या सुद्धा चर्चा सुरू असताना शिवसेनेकडे परभणी हिंगोली विधान परिषदेत जागा देण्यात आल्याची माहिती आहे.
* त्यामुळे अखेर 11 जागांवर भाजप चार जागांवर शिवसेना आणि दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे.

Vidhan Parishad Election 2026 : महायुतीचे अंतिम जागावाटप

भाजप -11
शिवसेना – 4
राष्ट्रवादी काँग्रेस – २

Vidhan Parishad Election 2026 : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, कोणाला कोणती जागा?, संपूर्ण यादी

भाजपा-(भाजप विधान परिषद निवडणूक 2026)
1) सोलापूर-
2) जळगाव-
3) भंडारा-गोंदिया
4) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5) अमरावती-
6) धाराशिव-लातूर-बीड
7) नागपूर-
8) छ. संभाजीनगर- जालना
९) अहिल्यानगर-
10) सांगली-सातारा
11) नांदेड-

शिवसेना-(शिवसेना विधान परिषद निवडणूक 2026)
1) ठाणे-
2) नाशिक-
3) परभणी-
4) यवतमाळ-

राष्ट्रवादी काँग्रेस- (NCP Vidhan Parishad Election 2026)
1) कोकण-
2) पुणे-

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगरठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Vidhan Parishad Election 2026 : आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा?

आधीचे आमदार कोण?-

सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूरबीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.