महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; कुठे कुणाचा अध्यक्ष?
महायुती मुंबई : महायुतीच्या गोटातून एक महत्वाचे बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) सत्ता स्थापनेचा महायुतीतील तिढा सुटला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार, अशी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.
दरम्यानरायगड जिल्हा परिषदेत पहिली सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष असणार आहे. याशिवाय अडीच वर्षे शिवसेना, तर सव्वा वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणार अशी माहिती आहे. कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर तिकडे रत्नागिरीत शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे. माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती, तर राष्ट्रवादीचा उपसभापती होणार, अशी देखील माहिती आहे.
Zilla Parishad Raigad : रायगड जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदाच्या सत्तेची भाजपला खात्री; भाजपने केली विजयी मेळाव्याची तयारी
एकीकडे महायुतीमध्ये चर्चा प्रलंबित असताना दुसरीकडे फक्त रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदवर भाजपचीf वर्णी लागेल, अशी खात्री असून भाजपने विजयी मेळाव्याची तयारी देखील प्रारंभ केल्याचे बघायला मिळालय. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 12 मार्च रोजी निवडणूक होतेय. या निवडणूकीत आपलाच अध्यक्ष बसणार, याची खात्री भाजपला झाली असून भाजपने विजयी मेळाव्याची तयारी देखील युरू केली आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्याचे शिंदे शिवसेनेचे प्रयत्न असफल ठरताना दिसत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शिवसेनेला दूर ठेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू केली आहे. अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर लगेचच अलिबागमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विजयी मेळावा घेतला जाणार आहे.
Parbhani : परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये भाजप राष्ट्रवादीचा वरचष्मा; 9 पैकी 4 भाजप, 4 राष्ट्रवादीकडे
परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड प्रक्रिया आज पार पडली ज्यामध्ये महायुती मधील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे 9 पैकी भाजपने 4,राष्ट्रवादीने 4 तर एका पंचायत समितीवर अपक्षाने वर्चस्व मिळवले आहे.
परभणीच्या जिंतूर मध्ये भाजपच्या आयोध्या खिस्ते सभापती तर सोनु दराडे या उपसभापती झाल्या आहेत सेलू ही भाजपकडे गेली आहे सेलूत विजयमाला डोंबे सभापती तर उपसभापती सुलभा घुगे,गंगाखेड मध्ये भाजपचे मनोज मुंडे सभापती तर उपसभापती सारिका खांडेकर,पालम मध्ये रेवता ढाले सभापती तर सुरेखा बडे या उपसभापती झाल्या आहेत तर पूर्णा पंचायत समितीत अपक्ष उज्वला पिसाळ ह्या सभापती झाल्या आहेत तर उपसभापती पदी काशीनाथ काळबांडे हे विजयी झाले आहेत.अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाथरीत येथे सुनीता डुकरे यांना सभापती तर उपसभापती म्हणून सचिन अंभोरे यांना केले आहेत.
मानवतमध्ये ही राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ सभापती तर सूरज काकडे हे उपसभापती झाले आहेत. परभणी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे रवी चव्हाण हे सभापती झाले आहेत. तर उबाठाचे विवेक पिसाळ हे उपसभापती झाले आहेत तिकडे सोनपेठ मध्ये ही राष्ट्रवादीच्या माया मुजमुले ह्या सभापती तर उपसभापती पद्मसिंह देशमुख यांची वर्णी लागली आहे.सर्वच ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवडी झाल्यानंतर जोरदार जल्लोष करण्यात आला.परभणीच्या पूर्णा आणि परभणी पंचायत समितीत उबाठा सेनेन राष्ट्रवादीला मदत केली ज्यात उपसभापती हे उबाठा सेनेला मिळाले आहे.राजकारणात काही ही होत असते असे विधान परभणी पंचायत समिती निवडीनंतर उबाठाचे आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.