स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये धुसफूस; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थि


महानगरपालिका-नगरपालिका निवडणूक 2025 मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतच (Mahayuti) धुसफूस पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर (Municipal-Nagarpalika Election 2025) युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध पहायला मिळतोय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरील आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्याने पाहायला मिळाला.

बैठकांमध्ये भाजपकडून होणारा त्रासामुळे युतीबाबत शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर पाहायला मिळतायत. अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याने शिवसैनिकांकडूनही स्वबळाचा नारा आता जोर धरू लागला आहे. जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युती संदर्भात निर्णय मुख्यनेत्यांच्या सूचनेनंतर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुठल्या जिल्ह्यांमध्ये महायुतीत धुसफुस आणि का? (Municipal-Nagarpalika Election 2025)

ठाणे(नगरपालिका)-

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असताना इथे मंत्री गणेश नाईक आणि संजय केळकर यांनी परस्पर स्वबळाचा नारा देत शिंदेंना डिवचले आहे. त्यावरून शिवसेनेच्या पदाधिकार्यांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. भाजप नेत्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेही स्वबळाची तयारी सुरू केली आहे

नवी मुंबई (नगरपालिका)-

नवी मुंबई महानगर पालिकेवर गणेश नाईक याचं वरदहस्त आहे. मात्र शिंदेबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवी मुंबईत भाजप विरूद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे संबध टोकाचे ताणले गेल्याने इथेही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे

कल्याण-डांबिवली (ग्रॅब्स)-

या नगरपालिकेत गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर भाजप आणि शिवसेनतील संबध टोकाचे ताणले गेलेले अशातच भाजप प्रदेशाध्यक्षाकडून शिवसेने विरोधात पाऊले उचलून अप्रत्यक्ष प्रतिस्पर्धींना मदत केली जात असून इथेही भाजपकडून स्वबळाचा नारा दिली जात असल्याने इथेही युतीची शक्यता धुसर आहे

मिरा-भाईंदर (नगरपालिका)-

या नगरपालिकेवर  भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे इथेही भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला झुकतं मापं दिलं जातं, यातच यंदा पालिकेची जबाबदारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जबाबदारी देणयात आली असून इथेही भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू केल्याने शिवसेनेकडूनही आता स्वतंत्र प्रयत्न सुरू केले आहेत

उल्हानगर (महानगरपालिका)-

उल्हासनगर शहरातही काही दिवसांपूर्वी भाजपने शहरातील समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावरून युतीतील संबध ताणले गेले आहेत. येथील स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी थेट पालिका आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता. येथेही शिवसेनेची सत्ता होती. तर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा आहे

अंबरनाथ (नगरपालिका)-

अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून भाजपने पालिका प्रशासनाला कोंडीत धरण्यास सुरूवात केली आहे. अभिजीत करंजुले यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील पथदिवे, रस्ते आणि इतर समस्यांवरून पालिकेचा टाळे ठोकण्याचा इशाराच दिला आहे. येथेही पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याने भाजप विरूद्ध शिवसेना जुंपली आहे

बदलापूर (नगरपालिका)-

बदलापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा आहे. आमदार कथोरे यांनी थेट पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशाराच अधिकाऱ्यांना दिला आहे. चौकाचौकात पालिकेच्या गैरकारभाराचे पुरावे देणार असे सांगत कथोरे यांनी थेट पालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेलाच आव्हान दिले आहे.

सांगली-

सांगलीत खानापूर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार सुहास बाबर याच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढलेले वैभव पाटील यांना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी

सातारा

साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात लढलेले सत्यजित सिंह पाटणकर यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला. कित्येक वर्ष या दोन घराण्यांचा संघर्ष सुरू असताना भाजपने प्रवेश दिल्याने नाराजी

रायगड-

मंत्री भरत गोगवले यांच्या विरोधात उबाठाकडून विधानसभा लढवलेल्या स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष आहे. रायगडमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उभे राहिलेल्या सुधाकर घारेंना प्रवेश दिल्याने राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना हा संघर्ष शिगेला पेटला आहे.

नाशिक-

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या तीनही पक्षात आपसी शितयुद्ध उघड आहे. भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद तर आहेच, भाजपकडून पालिकेत शंभरपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आवाहन केले जात असल्याने युतीच्या भरोस्यावर राहणे युतीचे असल्याचे मत बैठकित शिवसेना पदाधिकारयांनी मांडले

जळगाव

शिवसेनेचे पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिस्पर्धी वैशाली सुर्यंवशी यांना भाजपने प्रवेश दिला. नुसता प्रवेश न देता निधीही दिला जात असल्याने किशोर आप्पांनी उघडपणे युती होणार नसल्याचे म्हटले आहे. भाजप आम्हाला संपवायला निघाला असल्याची भावनाही बोलून दाखवली आहे.

धुळे-

धुळ्यात भाजपचे आमदार अमरिश पटेल यांची एकहाती सत्ता आहे. अशात शिंदेगटाची ताकद तिथे फारशी नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्यांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने नाराजीचा सूर

हिंगोली-

शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी वसमत व कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात स्वबळाचा नारा दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनीही महायुती होणार नसेल तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. निवडणुकीच्या घोषणेपुर्वीच शिंदेसेना व भाजपामध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे.

नांदेड-

नांदेडमध्येही चित्र काही वेगळे नाही शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद देशमुख रिंगणात होते बालाजी यांचा विजय झाला खरा,  पण देशमुखांना भाजपकडून रसद पूरवली जात असल्याची सल सेनेच्या पदाधिकार्यांच्या मनात कायम आहे.

आहिल्यानगर-

या जिल्ह्यात शिवसेनेची फारशी ताकद नाही मात्र भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा रोष आहे त्यामुळे जिल्हयात युतीसोबत जाण्याबाबत संभ्रम आहे.

नंदूरबार-

नंदूरबारमधील शिवसेनेच्याच आमदाराने माजी जिल्हाप्रमुख भाजपसाठी काम करत असल्याबाबतची तक्रार बैठकीत केल्याने इथेही भाजपसोबत संबध ताणले गेल्याची चर्चा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Ramdas Athawale On Raj Thackeray: गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर, राज ठाकरे संकुचित…; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Comments are closed.