नागपुरात तर्री पोह्यावरुन वाद, एकाला संपवलं; नवी मुंबईत जावयाने सासू अन् पतीला भोसकलं
नागपूर क्राईम न्यूज : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पोह्याची तरी अंगावर उडाली या क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या झाली आहे. कळमना भागात भर दिवसा ही घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही पुढे आला आहे. तर दसुरीकडे नवी मुंबईतील शिरवणे गावात दुहेरी हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीने पत्नी आणि सासूची रविवारी रात्री चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.
पोह्याची तरी अंगावर उडाली या क्षुल्लक कारणावरुन नागपूरमध्ये एका तरुणाची हत्या झाली आहे. शुल्लक वाद इतका विकोपाला गेला की सात आरोपींनी तरुणावर रस्त्याने पाठलाग करत चाकूने सपासप वार करत हत्या केली. योगेश शाहू असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेतील आरोपींना कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये तीन महिला व अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे.
चारित्र्याच्या संशयावरून नवी मुंबईत पत्नी आणि सासूला संपवलं
नवी मुंबईतील शिरवणे गावात दुहेरी हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पतीने पत्नी आणि सासूची रविवारी रात्री चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आयुष बाळू निकाळजे असे आरोपीचे नाव असून, त्याने पत्नी अपर्णा निकाळजे आणि सासू मालन गोसावी यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोघींचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, नेरूळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. नेमके काय घडले आणि या दुहेरी हत्येमागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
नागपूरमध्ये धक्कादायक घटना, विवाहितेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार, आरोपीला अटक
नागपूरमध्ये धक्कादायक घटना गडली आहे. 24 वर्षीय विवाहितेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलं आहे. जमीन व्यवहाराच्या बैठकीचे आमिष दाखवून 24 वर्षीय विवाहित महिलेला हॉटेलमध्ये नेऊन तिला गुंगीचे औषध पाजण्यात आले. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. पीडित महिला विवाहित असून मागासवर्गीय समाजातील असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे याने 8 जून रोजी जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या बैठकीचे आमिष दाखवून महिलेला हॉटेलमध्ये बोलावले. तेथे तिला गुंगीचे औषध पाजल्याचा आरोप आहे. महिला बेशुद्ध झाल्यानंतर अय्याज आणि त्याचा सहकारी अमीन शेख यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपींनी अत्याचाराचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे तिच्याकडून सुमारे ३ लाख ९ हजार रुपये उकळण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. धर्मगुरू असल्याचे सांगणारा तिसरा आरोपी मध्य प्रदेशात फरार झाल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.