17 वर्षे राजकीय षडयंत्र सहन केले, पण अखेर न्याय मिळाला; वडिलांच्या सुटकेनंतर राणा जगजितसिंह पाट

Ranajagjitsinha Patil on Pawanraje Nimbalkar Case: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) अखेर आज (20 जून 2026) विशेष न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता (Acquittal) केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. या ऐतिहासिक निकालानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली सविस्तर व प्रतिक्रिया दिली आहे.

“पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांची दुर्दैवी हत्या झाली त्याला आता जवळजवळ वीस वर्षे होत आली आहेत. गेली सतरा वर्षे या विषयाच्या बाबतीत जो प्रक्रियेचा विषय आहे तो सुरू आहे. न्यायादेवतेवर पहिल्यापासून आमचा विश्वास होता. 17 वर्षानंतर न्यायादेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. परंतु सतरा वर्षे या लोकांची कोण परत करणार? पद्मसिंह पाटील यांना 17 वर्षे हे सहन करावे लागले. त्यांचा या विषयाशी कुठलाही संबंध नसताना राजकीय षडयंत्राने हे केले गेले. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी पुढे येतील, परंतु आज निश्चितपणे आम्हाला मोठे समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, असे राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.

Ranajagjitsinha Patil: 17 वर्षे राजकीय षडयंत्र सहन केले

राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की, दुर्दैवाने पद्मसिंह पाटील यांना कोर्टात नेमकं काय झालं, याबाबत मी सांगू शकणार नाही आणि त्यांना ते समजणार देखील नाही. पण ही परिस्थिती कशामुळे उद्भवली, हे षड्यंत्र कोणी, कशामुळे केले, यात कोण कोण प्यादे होते? पद्मसिंह पाटील हे 1990 च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते, असा त्यांना शब्द दिला होता. काही कारणाने ते होऊ शकले नाही. 2009 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते, या काळात कॅबिनेटचा विस्तार होणार होता, बरोबर तेव्हाच काही लोकांनी याबाबतीत एका वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला, षडयंत्र रचले गेले. ते आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्या देखील लक्षात आलेले आहे. आता प्रत्यक्षात कोर्टाची ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर, त्याचे वाचन केल्यानंतर मी याबाबत सविस्तर बोलू शकेल. पण न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला.

Ranajagjitsinha Patil: योग्य वेळेस गरजेनुसार मी बोलेल

इतके दिवस आम्ही कोणी काहीच बोललो नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. बरेच जण याचा राजकीय फायदा घेत होते, अतिशय खोटी विधाने करत होते. परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही; योग्य वेळेस गरजेनुसार मी बोलेल,” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय.

Ranajagjitsinha Patil: आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल

दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असून, अमित शाह यांनी सीबीआयला वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत विचारले असता राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, “न्यायादेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठेही न्यायालयीन प्रक्रिया असेल, तिथं आमची बाजू आम्ही ठामपणे मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. या खटल्याला 17 वर्षे का लागले, नेमकं कोणी यात वेळकाढूपणा केला, हे आज ना उद्या मी निश्चित सांगेल,” असे त्यांनी म्हटले.

Ranajagjitsinha Patil: दुर्दैवी घटनेनंतर दुसऱ्याच महिन्यात घटनेचा राजकारणासाठी वापर

सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली, मग पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली? असा सवाल ओमराजे समर्थकांकडून विचारला जात आहे, यावर बोलताना राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केले की, “आमची मागणी निश्चितपणे राहणार आहे की, नेमकी हत्या कोणी केली? त्यात काय कारणं होती? अनेक गोष्टी आहेत ज्या मला आज बोलायच्या नाहीत. तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याचा योग्य तपास झाला तर या विषयातले खरे आरोपी कोण आहेत, ते आजही निदर्शनास येऊ शकते, असा माझा ठाम विश्वास आहे. या दुर्दैवी घटनेनंतर दुसऱ्याच महिन्यात या घटनेचा वापर राजकारणासाठी केला गेला,” असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Pawanraje Nimbalkar Case: पोलिसांची एक घोडचूक, पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले, ओमराजे निंबाळकरांना जबर धक्का, 20 वर्षांची लढाई हरले, नेमकं काय घडलं?

Comments are closed.