2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?

सचिन अहिर वरळी मुंबई : विधानपरिषदेचे उपसभापती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात भाष्य केलं. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अजून निर्णय घेतला नसल्याचं म्हटलं. मात्र, वरळीच्या जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सचिन अहिर म्हणाले.

वरळी कोणाचा सातबारा नाही

सचिन अहिर म्हणाले की, तुम्ही आता शिंदे साहेबांच्या पक्षाची जर मतं बघितली तर दोन दिवस अगोदर प्रचार करणाऱ्या माणसाला पण आठ – नऊ हजार मतं पडलेली. मी नेहमी सांगतो की वरळी हा व्हायटल मतदारसंघ आहे. काही जण म्हणतात बालेकिल्ला आहे, तर मग मी त्या बालेकिल्ल्यात कसं निवडून यायचो? शिवडी विधानसभेचा ज्यावेळी वरळी मतदारसंघ झाला तेव्हा मी वरळीतूनच निवडून आलो होतो. वरळीचा आमदार झाल्यानंतर तेव्हाच मी मंत्री झालो, असं सचिन अहिर म्हणाले.

वरळी हा वायटल मतदारसंघ आहे, तो म्हणजे ते मतदार इमिजिएट रिएक्ट करू शकतात. कोणाला वाटत असेल का वरळी आता आमचा सातबारा आहे तर तसं नाहीय माझाही नाही आणि कोणाचाही होऊ शकत, असंही सचिन अहिर म्हणाले.

वरळीकरांनी माझं काम बघितले आहे, त्यांच काम बघितलेल आहे. इतर लोकप्रतिनिधींचं काम बघितलेलं आहे. मला असं वाटते की मी आता वरळी पुरता संकुचित राहणार नाही. मला आता गल्लीच राजकारण न करता राज्याचं राजकारण करायचं आहे.  अर्थात वरळी पण राज्याचा एक भाग असल्यामुळे तिकडे देखील काम करेल.

वरळीच्या निवडणुकीबाबत सचिन अहिर काय म्हणाले?

वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत सचिन अहिर म्हणाले की मी ऑनेस्टली मी असं कुठचही मन बनवलं नाही किंवा माझी अशी कुठचीही चर्चा झाली नाही. पण मी लढो किंवा दुसरं कोणीतरी लढो. जागा निवडून तर आणावी लागणार आहे. निवडून आणण्यासाठी जे परिश्रम घ्यायचे असेल मग ते उमेदवार म्हणून मी असेन किंवा दुसरा असेन नक्कीच ती आपल्याला तयारी करावी लागेल.

पक्षबदलाबाबत सचिन अहिर काय म्हणाले?

जर भविष्यकाळामध्ये मला जर पुढे यायचं असेल तर मला असं वाटलं की ही एक संधी जी आलेली आहे त्या संधीच सोन केलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठेवला त्यामुळे पूर्ण ताकतीने आता पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. असं सचिन अहिर म्हणाले.

हेदेखील वाचा

Comments are closed.