संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तार

बुलढाणा :  शिवसेना नेते आणि आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. माझ्या मतदारसंघातही मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचं रोखठोक वक्तव्य त्यांनी केली आहे. (Sanjay Gaikwad)

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.  ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची प्रवासादरम्यान गळाभेट झाल्याचे देखील पाहायला मिळाले, यामुळे  या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. यासंदर्भात आता, बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षासोबत सत्तेमध्ये सोबत आले. अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे, सातारा प्रकरणाचा संदर्भ देत  राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे, महाराष्ट्राने बघितले आहे, असे सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत ही आमच्यासारखा खेळ होतो का? असे दिसून येत असल्याच आमदार संजय गायकवाड म्हणालेत. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशाप्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे कच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.(Sanjay Gaikwad)

मराठी and Abdul Sattar: आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात खलबतं

ठाण्यात एकनाथ शिंदे (मराठी) आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांमधील बैठक रात्री उशीरा संपली, एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. आयोजित केलेली बैठक ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सांगितले. तर अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचे देखील सांगितले आहे.

मराठी and Abdul Sattar: एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य

एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यासोबत साडेतीन तास बैठक झाली असून एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अंबादास दानवे यांच्यासोबत झालेल्या गळा भेटीबद्दल सांगताना अब्दुल सत्तार यांनी आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो, मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार असे सूचक वक्तव्य केले आहे. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत, हा विषय राज्याचा नाही, राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत. राष्ट्रवादी आमच्यापेक्षाही छोटा आहे, असे देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितले. आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार आणि राज्यातील 17 जागा या महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे (मराठी) यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार : शिंदे अन सत्तार काय म्हनाले?

अब्दुल सत्तार यांना सांगितलं आहे, महायुतीच्या प्रथा आणि महायुतीचे नियम पाळले पाहिजेत. तर यावरती अब्दुल सत्तार म्हणाले पक्षाच्या प्रमुखांनी एकदा जे सांगितलं ते आमच्यासाठी शेवटचं आहे. आज साडेतीन तास आमच्या पक्षाचे सर्व आमदार-खासदार या सगळ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पार्टीचे नियम आणि महायुतीचा जो धर्म आहे तो असे आदेश पाळा असं उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, त्यांनी आदेश दिलेत त्याचं पालन केलं जाईल असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे बंगल्यावर काल छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील शिवसेना नेत्यांची काल बैठक बोलावली होती. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जालनातून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला होता याबाबत चर्चा झाली. यामुळे महायुतीत रायगडनंतर संभाजीनगरात तिढा पहायला मिळत होता. त्यात रायगडबाबत कोकणातील आमदारांची मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढली, पालकमंत्री पदाच्या बदल्यात आमदारकी असे ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यावर एकमत झाल्याचे कळते. तर संभाजी नगरमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांची नाराजी एकूण त्यांची समजूत काढली. त्यामुळे दोन्ही जागांचा तिढा आता जवळपास सुटला असून दोन्ही ठिकाणी महायुती म्हणूनच या जागा लढवल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.