मी थांबलो नाही, मग पंतप्रधान मोदींना बोलू शकत नाही, शरद पवारांचं विधान; हैदराबाद गॅझेटवरही मोठं

Sharad Pawar On Narendra Modi कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा काल (17 सप्टेंबर) 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात अशा प्रसंगी कटुता ठेवू नये. यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानूसार आम्ही वागणारी माणसं आहोत, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. शरद पवारांनी आज सकाळी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

नरेंद्र मोदींना अवतारपुरुष म्हणण्याच्या गोष्टी मला समजत नाही. माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही, असंही शरद पवार म्हणाले. तसेच मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असं म्हणू शकत नाही, असं विधानही शरद पवारांनी केलं. पंचाहत्तरीनंतर थांबू असे बोललोच नव्हतो अस काही लोक म्हणतायत, असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या यू-टर्नवर देखील मिश्कील प्रतिक्रिया दिली.

देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं- शरद पवार

शिवरायांबद्दल आपण सगळेचं आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरुन शिवरायांनी एक संदेश दिला.सध्या शेतीचं नुकसान झालंय. महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली,शेतीचं नुकसान झालं. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झालं. सरकार पंचनामे कधी करतंय, मदत कधी पोहोचतेय, बघूया…देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं, असं शरद पवारांनी सांगितले.

काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू- शरद पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडंच मविआची युती असेल, असं नाही. स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू, असंही शरद पवारांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद,शक्ती आहे. मुंबई,ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही, असंही शरद पवार म्हणाले.

कटुता टाळण्याला मला हातभार लावायचाय- शरद पवार

हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारं आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नये. कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा, असं शरद पवार म्हणाले. सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली.दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्यांत एकाच जातीचे लोक का?, असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. परभणी,बीड,धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही अशी कटुता वाढलीय. 1994 साली हा आरक्षणाचा प्रश्नच नव्हता. विविध समाजाला लाभ व्हावा म्हणून मंडल अहवालावर निर्णय घेतले. मंडल आयोगाच्या अहवालावर सर्वांनी मिळून निर्णय घेतले. कटुता टाळण्याला मला हातभार लावायचा आहे. देशात आरक्षणाचा विचार कोल्हापुरातून निर्माण झाला. माझ्या मते शाहू महाराजांचा व्यापक हेतू आजही ठेवायला हवा, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय- शरद पवार

निवडणूक आयोगाच्या काही निर्णयावर देशात नाराजी आहे. 300 खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. 300 खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष कऱणारी बाब नाही. निवडणूक आयोगानं आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. 300 खासदार मोर्चा काढतात ही लहान-सहान गोष्ट नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच खासदारांसोबत बैठकीलाही अटी तटी घालणं योग्य नाही. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली ते सांगतायत. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगानं आपली विश्वासार्हता वाढवावी. राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगानं वाढवावा. राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय, असं शरद पवारांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=84hp2l5pcai

आणखी वाचा

Comments are closed.