सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत जाताना विमान अचानक बिघडलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान (Delhi Visit) एक मोठी माहिती समोर आली आहे. दिल्लीला जात असताना सुनेत्रा पवार यांच्या चार्टर विमानामध्ये मुंबई विमानतळावर अचानक तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे त्यांना उड्डाणापूर्वी मुंबई विमानतळावर तब्बल ४५ मिनिटे थांबून राहावे लागले. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले.(Sunetra Pawar Plane)

Sunetra Pawar Plane:  खासदारांच्या कंपनीचे विमान

मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी दिल्लीला जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन्ही दिवस ‘सीएमआर’ (CMR) कंपनीच्या चार्टर विमानाने प्रवास केला. विशेष म्हणजे, ही ‘CMR’ कंपनी आंध्र प्रदेशातील भाजप खासदार सी. एम. रमेश (CM Ramesh) यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. याच विमानात मुंबईत उड्डाणापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.(Sunetra Pawar Plane)

Sunetra Pawar Plane:  मुख्यमंत्री फडणवीसांचा इंडिगोने प्रवास

एकीकडे सुनेत्रा पवार यांनी दिल्ली दौऱ्यासाठी दोन्ही दिवस विशेष चार्टर विमानाचा वापर केला असताना, दुसरीकडे महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सामान्य प्रवाशांप्रमाणे ‘इंडिगो’ (Indigo) कंपनीच्या नियमित व्यावसायिक विमानाने दिल्लीला जाणे पसंत केले. राजकारणातील या दोन बड्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रवास पद्धतीची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विमानतळावरील तांत्रिक बिघाडामुळे काही काळ यंत्रणांची धावपळ उडाली होती, परंतु कोणतीही मोठी अडचण न येता पुढील प्रवास सुरक्षितपणे पार पडला.(Sunetra Pawar Plane)

Comments are closed.