मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 48 नगरपरिषदा अन् 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक; कोणत्या जिल्ह्यात किती?
मुंबई : राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं मोठं योगदान असून मराठवाड्यातील (Marathwada) नेतेमंडळी मराठवाड्याच्या विकासासाठी नेहमी आग्रही असते. त्यामुळेच, मुख्यमंत्री कोणीही असो, मराठवाड्याच्या विकासासाकडे, आमदार, खासदारांकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे (Election) सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे.
मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे, यासंदर्भाती माहिती खाली देण्यात आली आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकूण 48 नगरपालिका आणि 11 नगरपंचायत आहेत. तर, संभाजीनगर, लातूर या दोन महापालिकांसाठी निवडणुका होणार आहे. त्यात, सर्वप्रथम नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगावर आता वेळेचे बंधन आले असून, निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आज सर्वाधिक मानली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद : 05
गंगापूर नगरपरिषद
कन्नड नगरपरिषद
खुलताबाद नगरपरिषद
पैठण नगरपरिषद
वैजापूर नगरपरिषद
फुलंब्री नगरपंचायत
बीड जिल्ह्यातील नगरपरिषद 06
बीड नगरपरिषद
गेवराई नगरपरिषद
धारूर नगरपरिषद
परळी-वैजनाथ नगरपरिषद
माजलगाव नगरपरिषद
अंबाजोगाई नगरपरिषद
जालना जिल्ह्यातील नगरपरिषद 03
अंबड नगरपरिषद
भोकरदन नगरपरिषद
परतूर नगरपरिषद
जालना जिल्ह्यातील नगरपंचायत 04
घनसावंगी नगरपंचायत
तिर्थपुरी नगरपंचायत
मंठा नगरपंचायत
बदनापूर नगरपंचायत
परभणी जिल्ह्यातील नगरपरिषद 07
गंगाखेड नगरपरिषद
जिंतूर नगरपरिषद
मानवत नगरपरिषद
पाथरी नगरपरिषद
पूर्णा नगरपरिषद
सेलू नगरपरिषद
सोनपेठ नगरपरिषद
हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद 03
हिंगोली नगरपरिषद
कळमनुरी नगरपरिषद
वसमत नगरपरिषद
लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद 04
अहमदपूर नगरपरिषद
औसा नगरपरिषद
निलंगा नगरपरिषद नगरपरिषद
उदगीर नगरपरिषद नगरपरिषद
लातूर जिल्ह्यातील नगरपंचायत 05
चाकूर नगरपंचायत नगरपंचायत
देओणी नगरपंचायत नगरपंचायत
जळकोट नगरपंचायत नगरपंचायत
रेणापूर नगरपंचायत नगरपंचायत
शिरुर अनंतपाल नगरपंचायत
धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद 08
धाराशिव नगरपरिषद
तुळजापूर नगरपरिषद
उमरगा नगरपरिषद
मुरुम नगरपरिषद
कळंब नगरपरिषद
भूम नगरपरिषद
परंडा नगरपरिषद
नळदुर्ग नगरपरिषद
नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद 12
किनवट नगरपरिषद
भोकर नगरपरिषद
हदगाव नगरपरिषद
उमरी नगरपरिषद
धर्माबाद नगरपरिषद
बिलोली नगरपरिषद
मुखेड नगरपरिषद
देगलूर नगरपरिषद
लोहा नगरपरिषद
कंधार नगरपरिषद
मुदखेड नगरपरिषद
कुंडलवाडी नगरपरिषद
नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत : 01
हिमायतनगर नगरपंचायत
हेही वाचा
मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गंभीर आजारासाठी 10 लाख मिळणार
आणखी वाचा
Comments are closed.