मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी

मुंबई : आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. एफडीएच्या पथकाने एकाच दिवशी तब्बल 16 नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक छापेमारी (Raids) केली. या धडक कारवाईत मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ‘रुस्तम आईस्क्रीम’ (Rustom Ice Cream) दुकानाला मोठा दणका देत त्यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

या मोहिमेमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि अन्न उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. एकाच दिवसात झालेल्या या मोठ्या कारवाईत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

K Rustom Ice Cream Churchgate : ‘रुस्तम आईस्क्रीम’ दुकानात उंदीर आणि माशा

नरिमन पॉईंट येथील ‘रुस्तम अँड कंपनी’ (Rustom & Co. Ice Cream) हे मुंबईतील ग्राहकांचे आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते आणि जुने आईस्क्रीम केंद्र मानले जाते. मात्र, एफडीएच्या पथकाने जेव्हा या ठिकाणी तपासणी केली, तेव्हा तिथली दुरवस्था पाहून अधिकारीही चक्रावले.

तपासणीत खालील गंभीर त्रुटी आढळून आल्या :

अस्वच्छता : दुकानात स्वच्छतेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले होते. तिथे जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर आढळून आला.

कोल्ड चेन खंडित : आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली ‘कोल्ड चेन ऑपरेशन्स’ खंडित अवस्थेत होती.

मुदत संपलेली उत्पादने : दुकानात मुदत संपलेले (Expired Products) अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते.

नोंदणीचा अभाव : नियमानुसार आवश्यक असलेले अनिवार्य रेकॉर्ड दुकानात ठेवण्यात आले नव्हते.

या सर्व गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006’ च्या कलम 32 (3) अंतर्गत रुस्तम आईस्क्रीमचा परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित (K Rustom License Suspended) केला आहे.

Tukaram Munde Raid : एकाच दिवशी 16 ठिकाणी छापे

तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार एफडीएने केवळ मुंबईतच नव्हे, तर राज्यभरात ही मोहीम राबवली आहे. एकाच दिवसात १६ ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

कारवाईचा प्रकार संख्या / तपशील
एकूण तपासणी केलेली हॉटेल्स / रेस्टॉरंट्स 16
सुधारणा नोटिसा (Improvement Notices) बजावलेल्या आस्थापना 10
परवाने / नोंदणी निलंबित केलेले अन्न व्यावसायिक 02 (मुंबई १, नाशिक १)
नागपूर विभागात कारवाई 01 (परवाना निलंबन)
जप्त केलेला प्रतिबंधित साठा (गुटखा/पानमसाला) 9,60,416 रु

Tukaram Mundhe FDA Action : 6 लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक नव्हे, तर फौजदारी कारवाई देखील करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान राज्यभरातून तब्बल 9 लाख 60 हजार 416 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या बेकायदेशीर विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी FIR नोंदवण्यात आला असून, एका आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. “नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही; हॉटेल्स आणि अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा यापुढील काळात याहूनही कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.

ही बातमी वाचा:

Comments are closed.