आठवडाभरात बदल्यांचा यू टर्न! पोलीस दलात मोठे फेरबदल

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयपीएस आणि राज्य सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश काढले गेले आहेत. गेल्याच आठवड्यात गृह विभागाने 96 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच 14 आयपीएस आणि राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नव्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश निघाले. मोठ्या प्रमाणात बदलीच्या आदेशात बदल केले गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

प्रवीण पडवळ, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा, शारदा राऊत यांची विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंध विभाग, संजय येनपुरे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, रामनाथ पोकळे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) मुंबई, संदीप पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, पंजाबराव उगले यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ) यांची पोलीस सहआयुक्त ठाणे शहर, महेश पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र येथे बदली केली. तर राज्य सेवेतील उपमहानिरीक्षक श्रेणीत बदलीने/पदोन्नतीने सात अधिकाऱ्यांचे बदल्याचे आदेश काढले गेले. नागपूरचे अप्पर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त, दहशतवादविरोधी पथक पुणेचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रमोद शेवाळे यांची अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नवी मुंबई, विनिता साहू यांची उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल, अशोक दुधे यांची अप्पर पोलीस आयुक्त ठाणे पोलीस, आर. राजा, पोलीस अधीक्षक बिनतारी संदेश यांना बढती देत अप्पर पोलीस आयुक्त (बिनतारी संदेश) नियुक्ती केली.

ठाणे शहर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची पोलीस अधीक्षक राज्य पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे संभाजी कदम यांची पोलीस अधीक्षक दहशतवादविरोधी कक्ष पुणे, तर नुकतेच पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची पोलीस अकादमी, नाशिक येथे बदली केली होती. त्यांची नाशिक येथील बदली रद्द करून मुंबई शहर येथे नियुक्ती दाखवण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, मुंबई दलातील पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची पोलीस उपायुक्त ठाणे शहर, ठाणे पोलीस शहरचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांची पोलीस अधीक्षक डायल 112, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांची पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर, वसई-विरार, अमोल झेंडे यांची पोलीस उपायुक्त मीरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस उपायुक्त दीपक ग्रिहे यांची पोलीस अधीक्षक नाशिक गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांची पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस पुणे, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची पोलीस उपायुक्त पिंपरी-चिंचवड, प्रीती टिपरे यांची सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई, समीर शेख यांची अप्पर पोलीस अधीक्षक बीड, हिंमत जाधव यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स पुणे येथे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड, दत्तात्रय कांबळे यांची पोलीस उपायुक्त मुंबई शहर, नीलेश सोनावणे यांची पोलीस उपायुक्त ठाणे शहर, तानाजी चिखले यांची अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, पोलीस उपायुक्त शीला साईल यांची मुंबई शहर, बाळासाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त ठाणे शहर, एस. एस. बुरसे यांची उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई, ठाण्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची उपआयुक्त सागरी सुरक्षा विभाग (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रवींद्र परदेशी यांची समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट-1 पुणे, प्रकाश जाधव यांची पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) चे डॉ. विनय राठोड यांची पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, धीरजकुमार बच्चू (अप्पर पोलीस अधीक्षक कोल्हापूर) यांची पोलीस उपायुक्त ठाणे शहर, विमला एम. यांची अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण या ठिकाणी बदली करण्यात आली.

बदली आदेशात जुने बदलीचे ठिकाण बदलून नव्या ठिकाणी नेमणुकीचे आदेश दिले आहेत. यात मुंबईत आणि ठाणे येथेदेखील नवीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शीला साईल यांची मुंबईत आणि गेल्याच आठवड्यात नाशिक येथे बदली केलेले अकबर पठाण यांची पुन्हा मुंबईत बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, विवेक पानसरे, नीलेश सोनावणे यांची ठाण्यात बदली केली गेली, तर श्रीकांत परोपकारी यांच्यावर सागरी सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली. मुंबईप्रमाणे ग्रामीण भागातदेखील बदल्या आणि पदोन्नतीने अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.

Comments are closed.