रोहित पवारांच्या बारामतीच्या फेऱ्या वाढल्यात, त्यांना 2029 मध्ये तिथून लढायचं आहे का? युगेंद्र

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर पार पडत असलेल्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीकडे आज राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत सर्वपक्षांनी आणि नेत्यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आज पार पडत असलेल्या निवडणुकीच्या दिवशीच रोहित पवार (Rohit Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यावरून 2029 च्या निवडणुकीची देखील चर्चा सुरू झाली. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची जय पवारांनी (Jay Pawar) पुढची निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली, त्यावर जय पवारांनी मी कार्यकर्ता बनून सर्वांची कामे करू इच्छितो,असं म्हटलं, तर रोहित पवारांनी २०२९च्या निवडणुकीबाबत म्हटलं की, त्यावेळी कदाचित जय पवार आणि युगेंद्र पवार हे आमने सामने असू शकतात, असं म्हटलं, या सर्व बाबतीत युगेंद्र पवार (Yugendra pawar on baramati) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रोहित पवारांच्या बारामतीच्या फेऱ्या वाढल्यात त्यांना 2029 मध्ये तिथून लढायचं आहे का? या प्रश्नावरती देखील युगेंद्र पवारांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.

Yugendra pawar : त्यांना नक्की काय करायचं हे तुम्हाला……

रोहित पवारांना स्वतःला बारामती लढायची आहे असं काही आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, रोहित दादा असं का बोलले किंवा त्यांना नक्की काय करायचं हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. इतक्यात बारामतीत रोहित पवारांच्या सुद्धा चक्रा बऱ्याच वाढल्या आहेत, नक्की काय सुरू आहे, तुम्हाला समोर दिसतंय चित्र या प्रश्नावर उत्तर देताना युगेंद्र पवार म्हणाले, नाही, ते बारामतीच नाही तर महाराष्ट्रामध्ये ते फिरतात. बारामतीला असं सिंगल आउट करून चालणार नाहीत. ते परवा कोल्हापूरमध्ये पण होते. अकोल्याला गेलेले, नाशिकला होते, सगळीकडे ते फिरत आहेत.

Yugendra pawar : ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं….

रोहित पवार यांनी 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर युगेंद्र पवार यांनी आपली भूमिका मांडली. 2029 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात, जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं  एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, अशा शब्दात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार यांनी परखडपणे भूमिका मांडली.

Rohit Pawar: रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

जय पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, 2029 मध्ये मी विधानसभेचा उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते, ते ऐकावं लागतं, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाकडून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभं राहणार नसतील तर, जे कोणी उभं राहील, 2029 ला तसं बघितलं तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी सांगितले. रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदान केलं, त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, बारामतीत 2029 ला पवार विरूध्द पवार (Pawar VS  Pawar) अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.