लोणारे हत्याकांड प्रकरणाला 6 दिवस पूर्ण, आरोपी मोकाट, गोगावलेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
रायगड क्राईम न्यूज : रायगडच्या माणगाव मधील लोणारे येथील ओमकार रेसिडेन्सीमधील तरुणी हत्याकांड प्रकरणाला आज 6 दिवस पूर्ण झालेत. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी आता युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य आणि मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदन दिलं आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्याचे मागणी त्यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, आरोपीला पकडण्यात पोलिसांना अद्यापही कोणतेच यश येत नसल्याने अखेर विकास गोगावले यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची आता मागणी केली आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे भरदिवसा एका लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मुंबई गोवा महामार्गालगत लोणेरे इथं हा लॉज आहे. एक तरुण आणि एका तरुणीने लॉजमधील एक रूम भाड्याने घेतली. दुपारच्या सुमारास हा तरुण तिथून बेपत्ता झाला तर रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या हत्याकांडातील संशयित फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत. पोलिसांनी याबाबत लॉजच्या मालकाकडे चौकशी सुरू केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.