असं करू नको देवा, चार लोकात उठायचं-बसायचं अवघड झालंय…; मुंबई इंडियन्सचं IPL 2026 मधून पॅकअप?

MI VS SRH IPL 2026 : आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सची (MI) गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी तब्बल 6 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने मुंबईचे चाहते भावूक झाले. सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या चाहत्यांच्या भावूक पोस्ट आणि मीम्सचा महापूर आला असून, “असं करू नको देवा, चार लोकात उठायचं-बसायचं अवघड झालंय,” अशी आर्त साद चाहते आपल्या लाडक्या संघाला घालत आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई इंडियन्सचा चाहता वर्ग हा जगातील सर्वात मोठ्या फॅनबेसपैकी एक मानला जातो. मात्र, यंदाच्या हंगामातील खराब कामगिरी आणि संघ व्यवस्थापनातील बदलांमुळे चाहते आधीच नाराज होते. त्यातच सलग पराभवामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला संताप आणि दुःख व्यक्त करायला सुरुवात केली आहे. “आम्हाला ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये आता ट्रोल केलं जातंय,” अशी भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. काही मिम्समध्ये चाहत्यांनी देवाला साकडं घातलंय की, “कमीतकमी सन्मानजनक कामगिरी तरी करा, जेणेकरून आम्हाला चार चौघात ताठ मानेने चालता येईल.”

मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियम) सलग चार सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईने 243 धावा केल्या. रायन रिकल्टनने 123 धावांची ऐतिहासिक खेळी केली, जी आयपीएलच्या इतिहासात मुंबईच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज गोलंदाज संघात असूनही, मुंबईला ही मोठी धावसंख्या वाचवता आली नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना, सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये 93 धावा केल्या. त्यांनी 8.4 षटकांत पहिल्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. पण, वेळोवेळी विकेट पडत असल्याने मुंबई पुनरागमन करेल असे वाटत होते, पण हेनरिक क्लासेन आणि सलील अरोरा यांच्या स्फोटक खेळीमुळे संघाने आठ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

गुणतालिकेत घसरण; प्लेऑफचं गणित बिघडलं?

मुंबई इंडियन्सने आपल्या आठ सामन्यांपैकी फक्त दोन जिंकले असून सहा गमावले आहेत. चार गुण आणि -0.784 च्या नेट रन रेटसह, मुंबई इंडियन्स एलएसजीच्या पुढे, नवव्या स्थानावर आहे. मुंबईचे आता सहा सामने शिल्लक आहेत. जर त्यांनी आपले सर्व सामने जिंकले, तर ते 16 गुणांपर्यंत पोहोचतील. या परिस्थितीत, त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी मिळू शकते, तरीही त्यांचा नेट रन रेट महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. पण, जर मुंबईने आता एक जरी सामना गमावला, तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील. इतिहासात अनेक वेळा 14 गुणांसह संघ प्लेऑफमध्ये पोहोचले असले तरी, यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

हे ही वाचा –

BCCI Fine Riyan Parag : BCCIचा रियान परागवर ‘हंटर’! वेपिंग प्रकरणात कडक कारवाई; नेमकी काय शिक्षा झाली?, व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.