8 लग्न पचवले, नवव्या लग्नात बिंग फुटले; नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटला बेड्या

बीड : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक लग्न फसवणुकीचा प्रकार समोर आला होता. गुजरातमधील एका नवरीने खोटी ओळख सांगून आणि आधीच लग्न झालेलं असताना दुसऱ्यांदा विवाह करून नवरदेवाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणात नवरी कुसुमबेन घाटाड, तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख आणि अल्पवयीन भाऊ यांच्यासह एजंट असलेल्या सुरेखा सूर्यवंशी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता, बीड (Beed) जिल्ह्यातही अशाच बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे, आठ लग्न पचवल्यानंतर नवव्या लग्नावेळी या वधुचे बिंग फुटले आणि पोलिसांच्या बेड्या पडल्या.

बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी सक्रीय असल्याचं समोर आल आहे. यापूर्वीही ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने केली आहे. मात्र, असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक अन् नवरदेव अनेक असे म्हणण्याची वेळ आली आहे. येथील उमापूर गावातील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली. एकाच मुलीचे अगोदर आठ नवरदेवांसोबत लग्न लावण्यात आले. मात्र, पैशासाठी पुन्हा उमापूर येथील नवव्या नवरदेवासोबत एजंटकडून लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, हे लग्न लावण्यासाठी, जुळवण्यासाठी नवऱ्या मुलाकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली होती, लाखोंची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पीडित नवरदेव योगेश शिंदेने असून पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितला.

हेही वाचा

नसरापूर घटनेनंतर महाराष्ट्र कॅबिनेटचा मोठा निर्णय, लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आणखी वाचा

Comments are closed.