वांद्र्यात झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलीस परिसरात घुसताचं काय

वांद्रे रेल्वे स्थानक जमीनदोस्त : मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगरात बुलडोझर कारवाईचा (Bandra Railway Station Demolition) तिसरा दिवस आजही कारवाई सुरुच राहणार आहे. आज उर्वरित 40 टक्के इमारती पाडण्यात येणार आहेत.  मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात या अनधिकृत झोपड्या हटवल्या जात आहेत. मात्र, काल कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांनी जोरदार दगडफेक केली.

नेमकं काय घडलं? (Bandra Railway Station Demolition)

अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना परिसरातील इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीची संपूर्ण घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही समोरुन दगडफेक सुरुच होती. यानंतर ज्या ठिकाणाहून दगडफेक सुरु होती, तिथे अनेक पोलीस घुसले आणि अनेकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी लाठीचार्ज करून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेतलं. दरम्यान दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून अतिक्रमण हटववण्याचं काम सुरू आहे. आजपासून आणखी दोन दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.

वांद्रे अतिक्रमण प्रकरण नेमकं काय? (वांद्रे रेल्वे स्टेशन पाडणे)

1. मुंबईतील वांद्रे स्टेशन परिसरात, पश्चिम रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण करण्यात आलं आहे.

2. रेल्वे स्टेशनला घासूनच या अनधिकृत झोपडपट्ट्या असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेची समस्याही निर्माण झाली होती.

3. या ठिकाण 500 हून अधिक झोपडपट्ट्या असून तब्बल 5 हजार स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण आहे.

4. या ठिकाणी असलेल्या कचऱ्यामुळे अनेकदा आगीच्याही घटना घडल्या आहेत.

5. 27 नोव्हेंबर 2017 रोजी पहिल्यांदा या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याचे आदेश काढण्यात आले.

6. त्याविरोधात स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. सुमारे नऊ वर्षे या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

7. अखेर 29 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास मंजुरी देण्यात आली.

8. मुंबई हायकोर्टाच्या परवानगीनंतर पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण हटवण्याची मोठी कारवाई सुरू झाली.

9. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या कारवाईवेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ही कारवाई आणखी तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता आहे.

10. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांसाठी मार्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आरपीएफ आणि जीआरपीकडून एकत्रितपणे कारवाई- (Bandra Railway Station Demolition)

काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरनं वांद्र्याच्या रेल्वेलाईनच्या आजूबाजूच्या झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. एबीपी माझानंही ही बातमी लावून धरली. खडबडून जागी झालेल्या रेल्वेनं अखेर अतिक्रमणविरोधी कारवाईचं हत्यार उपसलं आहे. आरपीएफ आणि जीआरपीकडून एकत्रितपणे ही कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित बातमी:

Bandra Demolition VIDEO : वांद्र्यातील गरीब नगर झोपडपट्टीवर बुलडोझर, पोलिसांवर बाटल्या फेकल्यानंतर सौम्य लाठीचार्ज, कारवाई सुरूच राहणार

आणखी वाचा

Comments are closed.