रत्नागिरीत तरुणावर कोयत्याने सपासप वार, जीव सोडता सोडता मारेकऱ्यांची नावं सांगितली, व्हिडीओ व्
रत्नागिरी क्राईम न्यूज: रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे कोयत्याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे या 25 वर्षीय तरुणाची हत्या (Murder news) करण्यात आली. या तरुणावर वार केल्यानंतरचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याला वाचवणाऱ्यांना तरुणांना धन्यवाद देताना दिसत आहे. यावेळी तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसत आहे. सुरज झोरे हा मूळचा संगमेश्वर तालुक्यातील नायरी या गावचा रहिवासी. तो सध्या विरार येथे वास्तव्याला होता. गुरुवार 21 मे रोजी रात्री 9.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान या तरुणाचा खून करण्यात आला. (Ratnagiri news)
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवार 21 मे रोजी रात्री 9.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान साईनगर सात बंगल्याच्या मागे रेल्वे ट्रॅक परिसर येथे सुरज व त्याचे साथीदार एकत्र बसले होते. त्यानंतर त्यांच्यात कोणत्यातरी विषयावरून भांडण सुरू झाले. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. संशयित तिघांनी मिळून सूरजवर कोयत्याने मानेवर,हातांवर वार करुन त्याला जीवे ठारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते. सुरज तिथून कसाबसा निसटला आणि जवळ असणाऱ्या एका घराजवळ गेला. घराचा दरवाजा बंद होता. रक्तबंबाळ सुरज हा दरवाजावर उभा होता. घरामध्ये असलेल्या व्यक्तीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकरांनी हत्यार उभारून घरातील लोकांना धमकावले . घरात महिला , लहान मुलं असल्यामुळे दरवाजा उघडण्याचा धाडस कोण करू शकले नाही. मारेकरी गेल्याची खात्री होतात तिथे राहणाऱ्या लोकांनी दरवाजा उघडला आणि पोलिसात फोन देखील केला व तात्काळ पोलिसांनी येऊन सुरजला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सूरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना शुक्रवार 22 मे रोजी दु.2.30 वा.सुमारास सुरजचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड,नजीबूल शेख उर्फ सोनू अशी या तिघांची नावं आहेत. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत. घटनेबाबत सूरज झोरेची बहिण नंदा रमेश फाले (32,रा.राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग दहिसर,मुंबई) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा भाउ सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेला होता. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार, हे बघावे लागेल.
Nagpur Crime: नागपूरमध्ये 48 तासांमध्ये तीन हत्या
नागपूरमध्ये मागच्या 48 तासात नागपूरमध्ये हत्येच्या तीन घटना पुढे आल्या आहेत. पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्यात नातवाने आजी इंदुबाई चव्हाण हिची हत्या केली. आरोपी राज बागडे याने इंदूबाईच्या एटीएम मधून न विचारता पैसे काढतले होते त्या नंतर वाद झाला . त्या वादातून राज बागडे याने दारूच्या नशेत गळा आवरून हत्या केली. दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली ज्यात अज्ञातांनी संजय ठाकूर या मजुरांची हत्या केली. तिसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली जेथे भावाने भावाची हत्या केली .
पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्यात नातवाने आजी इंदुबाई चव्हाण हिची हत्या केली. आरोपी राज बागडे याने इंदूबाईच्या एटीएम मधून न विचारता पैसे काढतले होते त्या नंतर वाद झाला . त्या वादातून राज बागडे याने दारूच्या नशेत गळा आवरून हत्या केली. दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली ज्यात अज्ञातांनी संजय ठाकूर या मजुरांची हत्या केली. तिसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली जेथे भावाने भावाची हत्या केली .
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.