लग्नपत्रिकेवर वर-वधूच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार; राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकार लवक
लग्नपत्रिका जोडप्याचे वय अनिवार्य: राज्यात लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख (जोडप्याचे वय अनिवार्य) लिहावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत असून हा नियम लागू केला जाणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार देखील या निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. बालविवाहबाबत धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. परिणामी या निर्णयामुळे वर वधूचे वय कळू शकणार आहे. त्यामुळे बालविवाहला (बालविवाह)आळा बसणार असा दावा केला जात आहे. (लग्नपत्रिका जोडप्याचे वय अनिवार्य)
दुसरीकडे, राज्यात बालविवाहबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. परभणी जिल्हात 48% मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सरकारकडून सादर केलीय. बालविवाह कायद्याने गुन्हा असून देखील समोर आलेली आकडेवारी धक्कादेणारा आहे. परिणामी कायद्याची अंमलबजावणी कटरपणे व्हावी या अनुषंगाद्वारे या नव्या निर्णययाची तयारी राज्य सरकारने केली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती बालविवाह? (Child Marriage)
–परभणीतर 48%,
–बीडमध्ये 43.7%,
-धुळ्यात 40.5%
-सोलापुरात 40.3% मुलींचे 18 वर्षांपूर्वी विवाह झाल्याची माहिती
राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक (लग्नपत्रिका जोडप्याचे वय अनिवार्य)
बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होत असल्याच सरकारकडून मान्य करण्यात आले आहे. तर बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायदा, नियम व विशेष जनजागृती मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्ताव सरकारकडून अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Comments are closed.