संदीप देशपांडेंनी संजय दिना पाटलांच्या ‘त्या’ गाडीचे फोटो दाखवले, बड्या गुन्ह्यातील फरार आरोपीस
संजय दिना पाटील यांच्यावर संदीप देशपांडे: पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज एक पत्रकार परिषद (press conference) घेऊन खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संदीप देशपांडे यांनी थेट एक फोटो प्रसिद्ध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री आणि पोलिसांकडे केली आहे.
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: 10 कोटींची केबल चोरी आणि फरार आरोपीचं कनेक्शन
पत्रकार परिषदेत संशयास्पद फोटो दाखवत संदीप देशपांडे म्हणाले, “आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. या फोटोतील व्यक्ती कोण आहे? याच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे? ही व्यक्ती फरार आहे का आणि असेल तर कुठल्या गुन्ह्यामध्ये फरार आहे? नाशिकच्या केबल चोरीशी या व्यक्तीचा काही संबंध आहे का? जवळजवळ दहा कोटी रुपयांची ही चोरी होती. त्यामधील हा फरार आरोपी आहे का? याचे उत्तर पोलिसांनी द्यावे. हे असे लोक खरोखर असतील तर ते खासदारांसोबत काय करत आहेत? काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या गाडीचा अपघात झाला होता ती गाडी याच व्यक्तीच्या नावावर आहे का? या व्यक्तीचा खासदारासोबत फोटो आहे. माझी माहिती आहे की ही व्यक्ती गुन्हेगारीमध्ये आहे,” असा आरोप त्यांनी केलाय.
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: पत्रकारांना शिवीगाळ आणि ‘माजलेली’ दिलगिरी
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळ प्रकरणावर आणि नंतर व्यक्त केलेल्या माफीवरही देशपांडे यांनी कडाडून टीका केली. “ज्या पद्धतीने एक खासदार पत्रकारांना शिव्या घालत होता, ही भाषा पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही. कमिश्नरला सांग, डीजीला सांग मी बघून घेईल हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित नाही. पत्रकारांना आव्हान देत आहात. तुम्ही लोकशाहीला आव्हान देत आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला तुम्ही आव्हान दिलं,” असे देशपांडे म्हणाले.
खासदार पाटील यांनी व्यक्त केलेल्या दिलगिरीवर तोफ डागताना ते म्हणाले, “काल मी त्यांची दिलगिरी पाहिली, ती दिलगिरी होती की पत्रकारांवर केलेले उपकार होते? हे एकदा बाहेर येऊ द्या. ही दिलगिरी व्यक्त करायची कुठली पद्धत आहे? माझ्या मते ती सर्वात माजलेली दिलगिरी होती. त्यांना त्यात खंत वाटते, वाईट वाटते, असं कुठेही त्यांच्या बोलण्यातून दिसले नाही,” अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: तोच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही?
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, “या खासदारांना Y+ सुरक्षा आहे. सरकारने ती अजूनही का ठेवली आहे? आपण बघितले असेल तर एका अभिनेत्याचं एक हिट अँड रन प्रकरणाचं होतं, त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी एफआयआर (FIR) केला की सुरक्षा ज्यांची करतोय त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे म्हणून एफआयआर केला. मग काल तिथे जे वाय प्लस सुरक्षा रक्षक होते त्यांचे कर्तव्य आहे की, ते ज्यांना सुरक्षा देत आहेत त्यांनी जर एखादा गुन्हा केला तर त्यांनी एफआयआर नोंद करणे आवश्यक आहे, अजून देखील त्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. माझी आयुक्तांना विनंती आहे, गृहमंत्र्यांना विनंती आहे की, अशा प्रकारे जर कोणी अरेरावीची भाषा करत असेल तर कायद्याने त्याला संरक्षण द्यायला नको. राज ठाकरे यांनी ज्यावेळी परप्रांतीय विरोधात आंदोलन केले होते, त्यावेळी प्रक्षोभक भाषण केले म्हणून राज साहेबांची सुरक्षा काढून घेतली. तोच न्याय संजय दिना पाटलांना लागू होतो की नाही? हे एकदा गृहमंत्र्यांनी सांगावे,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: कायद्यापुढे कोणीही नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे!
या प्रकरणावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देखील दिले. “ज्या पद्धतीने संजय दिना पाटील वागत आहेत, त्यांना कोणाचं संरक्षण आहे? आपण कुठल्या लोकशाहीत जगत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, कायद्यापुढे कोणी नाही. एकदा हे मुख्यमंत्र्यांना सिद्ध करावे लागेल, कायद्यापुढे कोणीही नाही,” अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.