गाडी पार्किंग ते दरीत ढकलण्यापर्यंत…18 जूनला लोहगडावर ‘त्या’ 75 मिनिटांत काय घडलं? केतन कसं स
पुणे/लोणावळा: केतन अग्रवाल खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन संपूर्ण घटनेचे अत्यंत थरारक पद्धतीने ‘सीन रीक्रिएशन’ केले. मुख्य आरोपी सिया गोयल हिला कडक पोलीस बंदोबस्तात थेट त्या मृत्यूच्या पॉईंटवर नेण्यात आले होते, जिथून केतनला दरीत ढकलण्यात आले होते. या प्रक्रियेची अचूकता तपासण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत थेट मानवी आकाराच्या ‘डमी’चा वापर केला.
Ketan Agrawal Death : आदल्या दिवशी चौकशी, मध्यरात्रीनंतर मोहीम!
या संपूर्ण क्राईम सीन रीक्रिएशनचे नियोजन पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गुप्ततेने केले होते. पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान लोहगड किल्ल्यावरील “त्या” ठराविक पॉईंटबाबत सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी सकाळीच घटनास्थळी जाऊन ‘सीन रीक्रिएशन’ करण्याचा अंतिम निर्णय घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आरोपी सिया गोयल हिला सोबत घेऊन लोहगड किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले.
Ketan Agrawal Death : सियाने दाखवला ‘तो’ मार्ग; कड्यावर थरार रीक्रिएट
लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर, गुन्ह्याच्या दिवशी (१८ जून) केतनला घेऊन वर जाताना कुठल्या मार्गाचा वापर केला होता, तो रस्ता सिया गोयलने पोलिसांना स्वतः चालून दाखवला. त्यानंतर पोलीस तिला थेट त्या मुख्य पॉईंटवर घेऊन गेले, जिथून केतनचा बळी घेण्यात आला होता. गुन्हा नेमका कसा घडला आणि केतनला कशा पद्धतीने ढकलले गेले, हे वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी हुबेहूब तसाच प्रसंग तयार केला. यासाठी मृत केतन अग्रवाल याच्या वजनाची आणि उंचीची भासणारी एक “डमी बॉडी” (पुतळा) त्या ठिकाणी आणण्यात आली होती. पोलिसांनी सिया गोयलला त्या डमी बॉडीजवळ उभे केले आणि केतनला ज्या प्रकारे धक्का दिला होता, तसाच धक्का त्या डमी बॉडीला देण्यास सांगितले. सियाने धक्का देताच तो पुतळा थेट कड्यावरून खाली दरीत कोसळला.
Ketan Agrawal Death : पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
या संवेदनशील कायदेशीर प्रक्रियेसाठी स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ (Forensic Experts) घटनास्थळी उपस्थित होते. कड्यावरून ढकलल्यानंतर बॉडी कोणत्या गतीने खाली जाते, ती कुठे आदळते आणि तांत्रिक पुरावे काय सांगतात, याचा अभ्यास फॉरेन्सिक टीमने केला. या सीन रीक्रिएशन दरम्यानची प्रत्येक छोटी-मोठी नोंद, वेळेची गणितं आणि सियाच्या हालचाली पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या डायरीत आणि व्हिडिओ ग्राफीमध्ये कायदेशीर पुरावा म्हणून नोंदवून घेतल्या आहेत. न्यायालयामध्ये आरोपींना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांचे हे ‘क्राईम सीन रीक्रिएशन’ अत्यंत महत्त्वाचा आणि पक्का पुरावा ठरणार आहे.
Ketan Agrawal Death : केतनच्या हत्येचं रिक्रियेशन ‘कसं’ झालं?
– सियाला एकटीला घेऊन पुणे ग्रामीण पोलीस सकाळी 6:30 वाजता पोहचले. सोबत केतनच्या वजनाचा पुतळा आणण्यात आला.
– 18 जूनला लोहगडावर 75 मिनिटांत काय घडलं? हे प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी, केतन ऐवजी त्याच्या वजनाचा पुतळा घेऊन रिक्रियेशनला सुरुवात झाली.
– हत्येदिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9 वाजून 20 मिनिटांनी केतनने आलिशान वाहन आणि मागून आलेल्या चेतनने दुचाकी कुठं पार्क केली.
– तिकीट काढताना हावभावातून एकमेकांना काय सांगितलं? सीसीटीव्हीतील त्या प्रसंगात काय-काय घडलं?
– हत्येदिवशी लोहगडावर 10 वाजून 5 मिनिटांनी पोहचला, मग पुढची 15 ते 20 मिनिटं कुठं-कुठं ट्रेक केला. त्यावेळी चेतनने कसा पाठलाग केला.
– 10 वाजून 25 मिनिटाला घटनास्थळी कसे पोहचले. मग केतन आणि सियामध्ये काय-काय घडलं. तेंव्हा चेतन कुठं दबा धरुन बसला होता?
– 10 वाजून 35 मिनिटाला केतनला सिया आणि चेतनने कसं ढकललं? हे जाणून घेण्यासाठी पुतळ्याला हत्येदिवशी जसं ढकलून दिलं, अगदी तसंच ढकलून द्यायला लावलं.
– सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेले मनोरंजन तीन तासांत पूर्ण झाले.
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.