उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून ‘वेलकम’; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि वरळी मतदारसंघातील नेते सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण, आज विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आमच्या सहा खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहून आल्यानंतर मुंबई (मुंबई) मध्ये त्यांच्या स्वागतासाठी सचिन अहिर आले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी टीका केली. एकनाथ शिंदे जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही, मी काही खुलासा करणार नाही पण जे काही केले ते फुलप्रूफ आहे, असे म्हणत कायदेशीर पश्न उद्भवणार नसल्याचेच एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर म्हटले.
ग्रासरुटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पहिले जाते, त्यांनी आज महायुतीतून उपसभापतीपदाचा फॉर्म भरला आहे, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. फक्त मुंबईच नाही तर उपसभापती म्हणून ते महाराष्ट्राचे काम करतील, ते असल्याने शिवसेनेची ताकद मुंबई कामगार क्षेत्रात वाढेल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची माफक अपेक्षा असते, आज विधानपरिषद आमदार गोकुळ गीतेदेखील सहयोगी पक्ष म्हणून सोबत आहेत, आम्ही तोडायला नाही जोडला आलो आहोत. पॉझिटीव्ह आणि प्रॅक्टिकल रहाणे ही आमची भूमिका आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केले, एक टीम म्हणून काम करण्यात सचिन अहिर यांचा हातखंडा आहे, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
30 तारखेलाचा माझा शपथविधी हा योगायोग
आम्ही 2022 ला उठाव झाला, आज 30 तारीख आहे तेव्हा देखील याच तारखेला माझा शपथविधी झाला होता, हा योगायोग आहे, मी देवेंद्रजी एकत्र होतो दोघांनी टीम म्हणून काम केले. महाविकास आघाडीच्यावेळी विकासकामात थोडा बॅकलॉग होता, पण महायुतीच्या काळात महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात धावू लागला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी जुन्या आठवणी सांगितल्या.
सागर बंगल्यावर पोलीस पाठवले
मी एक सांगू का, देवेंद्रजींनी ते मुख्यमंत्री असताना 2019 ला 50 फोन केले, पण एकही उचलला नाही. एक तर तू राहशील, नाहीतर मी राहीन, अशी भाषा होती त्यांची. देवेंद्र फडणवीसांवर खोटे गुन्हे दाखल करणे, सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, हे करणारे, त्यांना अचानक पुतना मावशीचं प्रेम आलं आहे. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना सगळं कळतं. मी यावर आणखी बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदाबाबतच्या वक्तव्यावरुन एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.
हेही वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.