सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; सिया-चेतन यांंच्या पहिल्या भेटीचा अन् ‘दिवाळी पा

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा (Ketan Agrawal Case) काटा काढण्यासाठी केलेल्या नियोजनादरम्यान मोबाईलवर ‘कोडवर्ड’ (सांकेतिक भाषा) आणि ‘निकनेम’ (टोपणनावे) वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा डिलीट झालेला मोबाईल डेटा रिकव्हर (Ketan Agrawal Case) करण्यात यश मिळवले असून, आता हे चॅट्स डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.(Ketan Agrawal Case)

Ketan Agrawal Case : न्यायालयात पोलिसांचा महत्त्वाचा खुलासा

आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी संपत असल्याने काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासातील प्रगतीचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. पोलिसांनी सांगितले की, “आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलमधील जे चॅट्स डिलीट केले होते, ते सायबर टीमच्या मदतीने पुन्हा मिळवण्यात आले आहेत. या संभाषणात अनेक ठिकाणी कोडवर्ड्स आणि टोपणनावांचा वापर करण्यात आला आहे. हे संभाषण नेमके कशाबद्दल होते आणि त्यांचा उद्देश काय होता, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे.” या कारणासाठी पोलिसांनी कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

Ketan Agrawal Case : सियाच्या घरातून १ वर्ष जुना फोन जप्त; ‘दिवाळी कनेक्शन’चा तपास

तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून तिचा एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त केला आहे. आता पोलीस या जुन्या फोनचाही तांत्रिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची भेट एका दिवाळी पार्टीदरम्यान झाली होती आणि हा संपूर्ण घटनाक्रम एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील आहे. त्यामुळे हा जुना फोन या प्रकरणाच्या मूळ कटाचा छडा लावण्यासाठी किती महत्त्वाचा ठरेल, या दृष्टीने पोलीस सध्या तपास करत आहेत.

Ketan Agrawal Case : कोडवर्ड डिकोड करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

या संपूर्ण केसमध्ये दोघांचे चॅट्स पुन्हा मिळवणे हा पोलिसांसाठी मोठा टप्पा मानला जात आहे. मात्र, या चॅट्समध्ये वापरलेले सांकेतिक शब्द आणि टोपणनावे तपासात अडथळा ठरत आहेत. हे कोडवर्ड्स हत्येच्या कटाशी कसे जोडलेले आहेत, हे समजून घेण्यासाठी पोलीस सध्या फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन ते डिकोड करण्याचे काम अत्यंत वेगाने करत आहेत.

Ketan Agrawal Case : पोलिस कोठडीदरम्यान पोलिसांनी काय काय केले…

१) कट कुठे रचला, याची संबंधित ठिकाणी आरोपींना नेत तपासणी करण्यात आली.

२) हत्येचा सराव पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर झाला. तेथे सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली.

३) डिलीट डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले.

४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा केली, याबाबत चौकशी करून चेतनच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले.

५) सिया आणि चेतन यांना वेगवेगळे लोहगडावर नेत घटनेचे सीन रिक्रिएशन करण्यात आले. यावेळी चेतनचे गेट अॅनालिसिस करून सबळ पुरावा मिळवला.

६) लोहगडावरील सीसीटीव्हींची तपासणी करून एकमेकांना कसे खुणावले, याची चौकशी करण्यात आली.

७) १८ जूनपूर्वीही ३१ मे, ४ जून आणि १४ जूनला केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता का, याची घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली.

८) पुणेमुंबई महामार्गावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न केला.

९) नवे काही साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा असून, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.

१०) हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी किती वेळा लोहगडाची रेकी केली? या कटासाठी ते एकमेकांना किती वेळा भेटले? याची चौकशी करण्यात आली.

११) हत्येच्या कटात आणखी कोण सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली.

१२) हत्येच्या दिवशी सियाने घातलेले कपडे, बूट, बॅग तसेच चेतनची हुडी, पॅन्ट जप्त करण्यात आली.

हेदेखील वाचा

Comments are closed.