नवनीता राणा, नवनाथ हे चिल्लर विषय; रामरक्षा आंदोलनावर टीका, दानवे भाजप प्रवक्त्यांवर संतापले

नवनीत राणावर अंबादास दानवे : नवनीत राणा, नवनाथ बन हा चिल्लर विषय आहे. या विषयावर मी बोलत नाही असे म्हणत हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंची यांनीटीका केली. 18 जुलै रोजी नागपूर मध्ये उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन होणार आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा या अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत, यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नवनीत राणा हा चिल्लर विषय आहे असे म्हटले आहे. बन फन हे चिल्लर लोक असे बोलत असतात, असे म्हणत दानवे यांनी नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

राज्यात भाजप राष्ट्रवादीची जिरवते, राष्ट्रवादी भाजपची जिरवते असे सगळीकडे चालू असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री जरी उपमुख्यमंत्री सुनिता पवार असल्या तरी बीड जिल्ह्याची पालक मी आहे असे वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यावर बोलताना शिवसेना उबाठाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की “त्यांचीच अडवा आणि त्यांचीच जिरवा” असे सगळीकडे चालू आहे.. गोंदिया जिल्ह्यात पण आणि राज्यात पण राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपा जिरवते आणि भाजपा राष्ट्रवादी जिरवते अशी परिस्थिती असल्याचा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला.

भाजपा आपल्या प्रदेशाअध्यक्षाला बंगला देत असेल तर ही चूक आहे

सचिन अहिर उपसभापती यांच्याकरिता सरकारी बंगल्यावरून वाद सुरू आहे.. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की सचिन अहिर यांना जो बंगला देण्यात आला होता तो भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात आहे. जर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला देत असेल तर सगळ्याच पक्षाच्या अध्यक्षाला बंगला देण्यात यावा. हे सर्व जनतेच्या मालकीच्या आहे आणि भाजपा अशाप्रकारे त्यांना बंगला देत असेल तर ही चूक आहे असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी गोंदियामध्ये केले.

भारतीय जनता पार्टीकडे देशाला लुटण्याचा अजेंडा आहे. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला अंबादास दानवे यांचे प्रतिउत्तर दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासाच्या अजेंडा नाही आहे असे वक्तव्य केले. यावर अंबादास दानवे यांनी त्यांना प्रतिउत्तर देत भारतीय जनता पार्टीकडे देशाला लुटण्याच्या अजेंडा आहे असा टोला लगावला.

लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या वेळी मते खरेदी करण्यास अजेंडा होता

लाडक्या बहीण योजनेतील लाखो लाभार्थ्यांचे अर्ज बाद झाले आहेत. यावर अंबादास दानवे यांना विचारले असता महाराष्ट्रात 92 लक्ष लाडक्या बहिणीचे फॉर्म बाद झाले असून, हा निवडणुकीमध्ये मत खरेदी करण्याच्या एक अजेंडा होता अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

Comments are closed.