शिंदेंच्या खास अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी, सनदी अधिकारीही नेमले जाणार; CM-DCM मध्ये भडका; नेमकं

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यात नाराजीची  ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. याआधीच्या अ, ब, क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे. तर 19 ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी  अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यानंतर आता नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं

यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे. ड वर्गाच्या महापालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवरती आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेंवरती आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने त्याची एक शिंदेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. याआधीच्या अ ब क महानगरपालिका वरती सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे, तर १९ ड वर्गाच्या महानगरपालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवरती सनदी अधिकार नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नगर विकास विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होत असल्याची शिंदेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

कोणत्या महानगरपालिकांवरती पूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत

अ ब क वर्गातील दहा महानगरपालिकांमध्ये पूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत. उर्वरित ड वर्गातील 19 महानगरपालिकांपैकी मीरा-भाईंदर, कोल्हापूरसांगली, अमरावती या पाच महापालिका अधिसूचित केल्या आहेत. तिथेही आयुक्तपदी सनदी अधिकारी नियुक्त करणे अपेक्षित आहे. तर उर्वरित सांगलीमिरज-कुपवाडा, अहिल्यानगर, नांदेड- वाघाळा, जळगावधुळे, मालेगाव, अकोला, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, चंद्रपूर, लातूर, परभणीजालना, पनवेल, इचलकरंजी या महापालिकांमध्ये मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे प्रचलित धोरण आहे.या महानगरपालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

वैशिष्ट्य ठाणे जिल्ह्यातील सुद्धा महानगरपालिकामध्ये सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समोर जातोय त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजी पाहायला मिळते. विशेष करून वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार आणि मिरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जातात. मात्र त्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्या खात्याच्या अंतर्गत या सर्व महानगरपालिका आहेत. त्यामुळे महानगरपालिकामध्ये कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू झालाय का? अशा प्रकारची नाराजी पाहायला मिळतेय.

https://www.youtube.com/watch?v=xy9cuwwcxdo

आणखी वाचा

Comments are closed.