पंतप्रधानांच्या ‘इंधन बचती’च्या आवाहनाला पुण्यात हरताळ! सुनेत्रा पवारांसह अधिकाऱ्यांची बैठक ऑनल
पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीडीसी बैठक पार पडत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ही बैठक ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत आहे. सगळे सदस्य ऑनलाइन पध्दतीने बैठकीला उपस्थित राहिले आहेत. आज सकाळी ९ वाजता सुनेत्रा पवार विधान भवनमधून उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा या बैठकीत घेतला जातो. सुनेत्रा पवार यांची पालकमंत्री म्हणून पहिलीच जिल्हा नियोजन समिती बैठक आहे.(Narendra Modi)
उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. सुनेत्रा पवार यांच्या ताफ्यातल्या गाड्यांमध्ये काल कपात करण्यात आली होती. ताफ्यात तीन गाड्या घेऊन सुनेत्रा पवार जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी विधानभवनात दाखल झाल्याचे दिसून आले. (Narendra Modi)
Fuel Saving Appeal : बैठकीला आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या चालूच ठेवून पैशांची नासाडी सुरू
पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा पवार या आज जिल्हा नियोजन समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी घेत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा आव्हान देशवासियांना केल्यानंतर ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते कारण की इंधनाचा बचत व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला आलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या चालूच ठेवून चालक आत एसीमध्ये बसले असल्याचे पाहायला मिळतेय. सरकारी गाड्या पार्किंगमध्ये लाऊन एसी सुरूच ठेवत, जनतेच्या पैशांची नासाडी सुरू आणि मोदींच्या आवाहनाला छेद देण्यात आला आहे. पार्क केलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या एक एक तास चालू ठेवून चालक आत मध्ये बसले आहेत.
Fuel Saving Appeal : सुनेत्रा पवारांच्या चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचत, इंधनाचा कमी वापर आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी राज्यातील महायुतीच्या उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या आवाहनाला हरताळ फासल्याचं दिसून येतंय. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुंबई ते पुणे असा त्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केल्याचा दावा करण्यात आला असून त्यावरून विरोधकांनी टीका केली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आणि पर्यावरणपूरक वाहनांचा वापर केला. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कथित चार्टर्ड विमान प्रवासामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
Fuel Saving Appeal : मोदींच्या आवाहनानंतर सरकारकडून काटकसरीवर भर
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला आणि डिजिटल बैठका घेण्याचे आदेश जारी केले आहेत. मुख्य सचिवांच्या परिपत्रकानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.