‘नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा’

बीड : पुणे जिल्ह्यातील नसरापूर (Nasarpur) येथे दोन महिन्यांपूर्वी राक्षसी प्रवृतीची घटना घडली होती, एका चिकमुलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिची निर्घुणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली, मात्र राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले. या घटनेनंतर संतापाची लाट निर्माण होऊन आंदोलनही करण्यात आले होते. अखेर, शासनाने हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज याप्रकरणी न्यायालायने निर्णय दिला. याप्रकरणी, न्यायालयाकडून (Court) आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, मनोज जरंगे पाटील यांनी देखील निकालाचे स्वागत केले.

पुण्यातील नसरापूरचा हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे म्हणत न्यायालयाने भीमराव कांबळेला (Bhimrao Kamble) दोषी ठरवलं. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता त्याची कल्पना होती की त्याला काही होणार नाही, म्हणून तो ही कृती करायला धजावला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली, या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत आहे. त्यावर, मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, आता संतोष देशमुख हत्याप्रकरणाचाही असाच तातडीने निकाल लावावा, अशी मागणी केलीय.

नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील निकालावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केलं जात असून नराधमास न्यायालायने दिलेल्या शिक्षेचं स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यामुळे, आजच्या निकालानंतर त्यांनीही प्रतिक्रिया देत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातही तो नियमा लावावा

मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे, त्यांनी तत्परता दाखवली आणि दोन महिन्यात आरोपीला शिक्षा झाली‌. असाच नियम संतोष देशमुख प्रकरणात सुध्दा लावायला पाहिजे. मालेगाव येथील 3 वर्षीय मुलीच्या प्रकरणात सुध्दा हेच केलं पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. आरोपीला फाशी झाली तर नसरापुरच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळाला. आता, संतोष देशमुख, महादेव मुंडे, मालेगाव या प्रकरणातही तोच नियम लावायला पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात मी जातो – जरांगे

मी स्वतः सरकार आणि बच्चू कडू पण आहेत. रोहित पवारांचं पण आंदोलन आहे, ते पण यामध्ये आहेत. मी शेतकऱ्यांसाठीच्या प्रत्येक आंदोलनात जातोच, असे म्हणत शेतकरी कर्जमाफी आणि रोहित पवारांच्या आंदोलनावर जरांगे पाटील यांनी भाष्य केलं.

हेही वाचा

भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?

Comments are closed.