राज्यात 14 ठिकाणी भाजप अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली; कोणत्या महापालिकांमध्ये झाली

महापालिका निवडणूक 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमुळे (Municipal Election 2026) राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या. काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर अनेक पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, काही ठिकाणी पक्षांतर करणाऱ्या ‘आयाराम’ नेत्यांना तिकीट देण्यात आल्याने अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.

BJP-Shiv Sena alliance: भाजप–शिंदे गट युतीत ताणतणाव, 14 ठिकाणी युती तुटली

महायुतीमधील जागावाटपावरून भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. काही महानगरपालिकांमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याने पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. तर काही ठिकाणी शिंदे गटाने युती करण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थिती लक्षात घेता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 14 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावतीमालेगाव, अकोलामीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगलीछत्रपती संभाजीनगर आणि जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये तिरंगी किंवा बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.

Municipal Election 2026: मुंबई आणि ठाण्यात मात्र युती कायम

जरी 14 ठिकाणी महायुती तुटली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटामध्ये युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे वेगळी असणार आहेत.

Municipal Election 2026: 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल

दरम्यान, राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणेपिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे जिथे युती कायम आहे आणि जिथे युती तुटली आहे, त्या दोन्ही ठिकाणी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

बलाढ्य भाजपासमोर जागावाटपात बाजी; शिंदेंचे 2 मोहरे अडून राहिले, मुंबईत 90 जागा मिळवल्या, शिंदेंच्या U आणि R फॉर्म्युल्याची कहाणी

आणखी वाचा

Comments are closed.