नाईकांनी ठाण्यातच नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरतही जनता दरबार घ्यावा : रामदास कदम
मुंबई: सरकार जी काम करतेय हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे, हे चांगलंय. बाळासाहेब कायम म्हणायचे लोकांचा मोर्चा कामानिमित्त येत असेल तर मंत्र्यांनी स्वत: गेलं पाहिजे. लोकाभिमुक्त शासन आहे हे दाखवायला पाहिजे. नाईकसाहेब (Ramdas Kadam) हे माझे चांगले मित्र आहेत. मधल्या काळात ते घरी बसले होते. विशेष काम त्यांच्याकडे काही नव्हतं. आता ते मंत्री झालेत त्यांना वाटतं महाराष्ट्रात सर्वत्र जाऊन आपण काम पहावं, हे चांगलयं. दरम्यान, नाईकांनी नुसते ठाण्यातच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र जनता दरबार घ्यावेत. तसे ते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातही (Nagpur) घ्यावेत. ज्यामुळे ते किती चांगलं काम करतात हा आदर्श निर्माण होईल. मंत्री गणेश नाईक डॅशिंग आहेत. एकेकाळी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत ते होते. नव्या नवरीचे नऊ दिवस असतात. काही तरी काम दाखवायचं असतं म्हणून करतात. मात्र काही अॅक्शन होतं नसल्याचा मिश्किल टोला शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लगावला आहे.
पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आज (3 जानेवारी) ठाण्यात जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रकरणी रामदास कदम यांनी भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. असल्याचे जाहीर केले आहे.
तटकरेंबाबतच्या प्रश्नावर पडदा पडलाय, झालं गेलं गंगेला मिळालं
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत जो निर्णय आधी झाला त्याची खंत निश्चित वाटते. मात्र फार काळ वाट पहावी लागणार नाही. तीनही प्रमुख नेते योग्य तो निर्णय घेतील. पालकमंत्री पदाची घाई नेत्यांपेक्षा पत्रकारांना जास्त आहे. तटकरेंबाबतच्या प्रश्नावर पडदा पडलाय, झालं गेलं गंगेला मिळालं. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट दिलीच पाहिजे असं नाही. योगेश कदम याला मंत्री केलं, कॅपेबल असतील ते तर पालकमंत्री देतील. युतीत मतभेद होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे हे काळा जादूच्या बादशहा- रामदास कदम
काळा जादूच्या बादशहा हे उद्धव ठाकरे आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी वर्षा बंगलामध्ये एक टोकरी लिंबू भेटली होती. त्यामुळे काळा जादूच्या बादशाह उद्धव ठाकरे आहेत असा विधान करत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संजय राऊत आणि सामनाकडून एकनाथ शिंदे यांच्या सातत्याने बदनामी केली जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जावू, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.