साताऱ्याचे SP तुषार दोषी निघाले सांगलीला, एकनाथ शिंदेंच्या सभेच्या दिवशीचा बदलीचे आदेश
तुषार दोशी मुंबई : साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यामुळं वादात अडकलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. गृह विभागानं पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यां जाहीर केल्या. सातारा जिल्हा परिषदेतील राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्यात जाहीर सभा होणार आहे. नेमक्या याच दिवशी तुषार दोशी यांच्या बदलीचा आदेश जारी झाला आहे. आता पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
तुषार दोशींवरुन विधिमंडळात रणकंदन
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी सातारा पोलिसांकडून साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. सातारा पोलीस अधीक्षक त्या वादामुळं चर्चेत आले होते. या वादानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यामुळं विधिमंडळात मोठा पेच निर्माण झाला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली..
सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष निवडीवेळच्या राड्यानंतर आज एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सभा होणार आहे. या सभेच्या दिवशीच तुषार दोशी यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. निखील पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर असताना मोठी घडामोड पाहायला मिळतेय. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीच्या रजेवर पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना काही दिवस पाठवल्यानंतर आज अचानक तुषार दोशी यांची बदली सांगलीला करण्यात आली आहे.
तुषार दोशी काही दिवस रजेवर गेले होते. रजेवरुन पुन्हा हजर झाल्यानंतर काही दिवसातचं तुषार दोशी यांची बदली झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी घडलेल्या प्रकारानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांच निलंबन करण्याचे आदेश सरकारला दिले होते.
इतर पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्या
तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा पदावरुन पोलीस अधीक्षक, सांगली पदावर बदली
निखिल पिंगळेपोलीस उप आयुक्त, पुणे पदावरुन पोलीस अधीक्षक, सातारा पदावर बदली
संदिप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली येथून पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पदावर बदली
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची बदली पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली सर्किट (पदभार सांभाळण्यासाठी) करण्यात आली आहे.
निलोत्पल पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथे बदली
एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावरुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली पदावर बदली
महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव पदावरुन पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदावर बदली
श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक, धुळे पदावरुन पोलीस अधीक्षक, जळगाव पदावर बदली
राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त, पुणे पदावरुन पोलीस अधीक्षक, वाशिम पदावर बदली
आणखी वाचा
Comments are closed.