एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची

शिवसेना एकांत शिंदे ऑपरेशन टायगर: एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे सहा खासदार आणि विधानपरिषदेतील आमदार सचिन अहिर यांना गळाला लावले होते. एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या या धक्क्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला आणखी खिंडार पडून पक्ष खिळखिळा झाला आहे. या सगळ्याची चर्चा थांबत नाही तोच आता शिंदे गटाकडून नाशिकमध्ये ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का देण्याच्या हालचाली सुरु आहेत. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक सध्या शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.  (Maharashtra Politics news)

सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने गळ टाकला आहे. नाशिक महापालिकेच्या वर्तुळात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहेत. ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांच्या शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरे गटाच्या या नगरसेवकांना प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दिल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटना विस्तारासाठी सुरु असलेल्या या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

फक्त नाशिकच नव्हे, तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे.  नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या वेळी मंत्री उदय सामंत दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षाचे नगरसेवक होते, त्यातून कोणी प्रवेश करत असेल तर स्वागत आहे, हे ऑपरेशन नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आकर्षण असल्याचा दावा अजय बोरस्ते यांनी केला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ही अनेक प्रवेश होणार असल्याचा दावा बोरस्ते यांनी केला आहे

Raigad Politics: रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेला मोठा धक्का

रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे रोहा माजी तालुका प्रमुख मनोज शिंदे करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आज खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.  मनोज शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय गणित बदलणार आहे. मनोज शिंदे हे शिंदे शिवसेनेचे माजी रोहा तालुकाप्रमुख आणि उत्तर रायगडचे उपजिल्हाध्यक्ष होते. नगरपालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानंतर त्यांची शिंदे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

मुंबई BMC बातम्या: मुंबई महानगरपालिकेत भाजपचा एक नगरसेवक वाढणार

मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमच्या नगरसेविका (mim corporator) रोशन इरफान शेख (roshan sheikh) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे शेख यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रोशन शेख यांचे नगरसेवकपद गेले आहे. त्यामुळे भाजपला तिसऱ्यांदा लॉटरी लागण्याची शक्यात निर्माण झाली असून भाजपचाच आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. प्रभाग 138 मधील AIMIM चे नगरसेवक रोशन शेख यांचे सदस्यत्व जात रद्द होत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद गेले आहे. त्यामुळे या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले…

Comments are closed.