विदर्भातील साडेपाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर भयाण संकट; साडेपाच हजार कोटींच्या कर्जमाफीची आस
विदर्भातील शेतकरी कर्जमाफी : विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात एक मस्तवाची बातमी समोर आली आहे. मागील कित्येक वर्षापासून, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाला भाव नसणे, असा एक अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांचे (Vidarbha Farmer) पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कर्ज भरू न शकलेले शेतकरी (Farmer Loan Waiver) ही कर्जमाफीची आस लावून बसले आहे. येत्या सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू होत आहे. या अधिवेशनात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmer) योग्य वेळी कर्जमाफी देण्याची अनेकवेळा घोषणाही केली. मात्र, या कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनात होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यानविदर्भातील 5 लाख 55 हजार 807 शेतकऱ्यांकडे 5410 कोटी 78 लाख 21 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. शेतकरी कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून माहिती गोळा केल्या गेली आहे. नेमकं कोणत्या जिल्ह्यात थकीत कर्जदार शेतकरी आणि थकीत रक्कम काय हे आपण जाणून घेऊ.
यवतमाळ जिल्हा (Yavatmal जिल्हा)
थकीत कर्जदार शेतकरी
1 लाख 32 हजार 119
थकीत रक्कम
1401 कोटी 13 लाख
नागपूर जिल्हा (नागपूर जिल्हा)
थकीत कर्जदार शेतकरी- 13 हजार 234 शेतकरी
थकीत रक्कम- 184 कोटी 71 लाख
अकोला जिल्हा (Akola जिल्हा)
थकीत शेतकरी – 61 हजार 244
थकीत रक्कम- 641 कोटी 72 लाख
वाशिम जिल्हा (वाशिम जिल्हा)
थकीत शेतकरी – 60 हजार 507
थकीत रक्कम- 621 कोटी 15 लाख
बुलढाणा जिल्हा (Buldhana जिल्हा)
थकीत शेतकरी- 28 हजार 173
थकीत रक्कम- 228 कोटी 79 लाख
चंद्रपूर जिल्हा (Chandrapur जिल्हा)
थकीत शेतकरी – 79 हजार 230
थकीत रक्कम – 785 कोटी
गडचिरोली जिल्हा (Gadchiroli जिल्हा)
थकीत शेतकरी- 4 हजार 247
थकीत रक्कम- 36 कोटी 89 लाख 21 हजार
गोंदिया जिल्हा (गोंदिया जिल्हा)
थकीत शेतकरी- 46 हजार 603
थकीत रक्कम – 289 कोटी 16 लाख
वर्धा जिल्हा (वर्धा जिल्हा)
थकीत शेतकरी- 19 हजार 600
थकीत रक्कम- 120 कोटी 10 लाख
भंडारा जिल्हा (भंडारा)
थकीत शेतकरी- 37 हजार 437
थकीत रक्कम – 303 कोटी 80 लाख
अमरावती जिल्हा (अमरावती)
जिल्हा बँकेचे थकबाकीदार शेतकरी – 73 हजार
अन्य बँकेचे थकबाकीदार शेतकरी – 80 हजार
30 जून 2025 पर्यंत थकीत कर्ज – 1500 कोटी
इत्तर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.