कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा

कोल्हापूर : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडीओ प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली होती. एका रिलस्टार तरुणाने अनेक महिला आणि मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवत व्हिडिओ चित्रीकरण केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. आता, कोल्हापुरात (Kolhapur Crime News) देखील परतवाड्याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे. युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे या युवकाला अटक करण्यात आली, न्यायलयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, त्याच्या फरार मित्रालाही पोलिसांनी (Police) कराडमधून अटक केल्याची माहिती आहे. याप्रकरणात, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

शाहिदीने तरुणीवर अत्याचार करुन, त्याचे व्हिडीओ बनवत ते मित्राला शेअर केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदचा मित्र शाहरुख देसाई या कारवाईनंतर फरार झाला होता. मात्र, स्थानिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले, शाहरुखला कराडमधून अटक करण्यात आली आहे. तर, पोलीस तपासात दोघांचेही आणखी काही प्रकरणे समोर आले आहेत.

पुलाची शिरोली गावातील अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी शाहिद सनदे याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, 2022 साली शाहिदने आणखी एका महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार पुढे आली असून, या प्रकरणी कोल्हापूर शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात शाहिदचा जवळचा मित्र शाहरुख देसाई यालाही कोल्हापूर पोलिसांनी कराड येथून ताब्यात घेतले. शाहरुख देसाई याच्या विरोधात देखील दोन महिलांनी तक्रारी दिल्या असून, त्या तक्रारींची शहानिशा पोलिसांकडून सुरू आहे. चौकशीअंती त्याच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी शाहिद सनदे याने दोन ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणींवर अत्याचार केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. शाहिद आणि शाहरुख हे दोघेही एकमेकांचे निकटचे मित्र असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. दरम्यान कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल याची भेट घेतली, त्याच बरोबर दोषींवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांनी SIT स्थापन करून सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून आश्वासन

दरम्यान, पुलाची शिरोली प्रकरणी पोलीस अधीक्षक यांची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये पोलिसांनी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस पोहोचतील असं आश्वासन दिले. त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पडले.

हेही वाचा

महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो

आणखी वाचा

Comments are closed.