भीमराव कांबळेला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे? आरोपीच्या वकिलांनी तो म

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी(१ मे) रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षांच्या नराधम आरोपीने अत्याचार करून तिला निर्घृणपणे संपवलं होतं. या प्रकरणी (Nasrapur Case Verdict) पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज (२९जून) अंतिम फैसला सुनावला. ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा न्यायालयाकडून सुनावण्यात आली. न्यायालयाने हा गुन्हा ‘अत्यंत दुर्मिळ आणि अमानवी’ असल्याचे म्हणत भीमराव कांबळेला (Bhimrao Kamble) दोषी ठरवलं आहे. विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर केला. (Pune Nasrapur Case Result Marathi News) या निकालानंतर नसरापूर प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पत्रकार परिषद घेतली, यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत आरोपीच्या क्रूरतेची माहिती दिली आहे.

Nasrapur Case Final Verdict:  आरोपीने त्या मुलीच्या मृतदेहावर देखील अत्याचार केले

अजय मिसर (Ajay Misar) म्हणाले की, आज अंतिम निकाल न्यायालयानं जाहीर केला. सगळे दोष याआधीच सिद्ध झाले आहेत. आम्ही १२ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पटलावर ठेवले होते. ६५ वर्षीय इसमाने साडे तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. हा एक कट होता, त्यानं मुलीचा पाठलाग केला, तिच्यावर पाळत ठेवली. गाठी शेवेचं आमिष दाखवून वासरू बघायला नेऊन मुलीवर अत्याचार केले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी मुलीसोबत जाताना आणि नंतर एकटाच परतताना दिसत होता. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. आधीच्या दोन गुन्ह्यात तो सुटला आणि म्हणून त्याने या मुलीवर अत्याचार केले. त्यात काही सुधारणा होईल अशी आशा बाळगणे चुकीचे ठरेल. त्याने क्रौर्याचा कळस गाठला होता. आरोपीने त्या मुलीच्या मृतदेहावर देखील अत्याचार केले होते. न्यायालयाने याबाबत सविस्तर भाष्य केले, असं विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी म्हटलं आहे.

Nasrapur Case Final Verdict: पुराव्यांची साखळी जोडण्यात आली नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा

तर भीमराव कांबळे आत्ता फासावर लटकायच अशा भाषेत न्यायालयाने आपला युक्तिवाद संपवला आहे. १२०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं आणि सगळे पुरावे जोडण्यात आले होते, २९ मे मध्ये खटल्याला सुरूवात झाली. १६ दिवसात ५५ साक्षीदारांची साक्ष पूर्ण केली, एकच प्रश्न होता आरोपीच्या वयाचा, मात्र या वयात देखील त्याची वासना संपली नाही असं कोर्टाने निकालात नमूद केलं आहे. ज्या प्रकरणात जनभावनेचा प्रक्षोभ होतो, जनता न्याय करण्याची भाषा करते, हे गंभीर असल्याची नोंद न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने पोलिसांचं अभिनंदन देखील केलं आहे. न्यायालयाने साक्षीदारांसह सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे. लहान मुलांची साक्ष देखील घेतली आहे. बलात्कार, हत्या आणि पॉक्सो प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडण्यात आली नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा होता. आरोपीचं वय लक्षात घेता त्याला फाशी न देता आजन्म कारावासाची शिक्षा मिळावी अशी बचाव पक्षाची मागणी होती. हा एक ऐतिहासिक निकाल आहे, जो विक्रमी वेळेत पूर्ण झाला, अशी प्रतिक्रिया देखील विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली आहे.

Nasrapur Case Final Verdict: आरोपीचा वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही – न्यायाधीश

शांत डोक्याने केलेली हत्या त्यातील क्रूरता तसेच त्या घटनेमुळे समाजाला बसलेला धक्का असे सगळे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असतात. याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावे आहे. आरोपीचा गंभीर पूर्व इतिहास होता आणि टेस्ट या प्रकरणी सिद्ध होते. मुलीला टॉर्चर करण्यात आला आहे. मुलगी असहाय्य (helpless) होती. स्वतःची वासना (lust) पूर्ण करण्यासाठी ही आरोपीने हे कृत्य केलं आहे. याने समाजाला धक्का बसला आहे. आरोपीचा वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत अमानवी कृत्य केलं. त्याला भीती नव्हती. त्याचा पूर्व इतिहास होता, त्याची कल्पना होती की, त्याला काही होणार नाही म्हणून तो ही कृती करायला धजावला नाही. निर्भया प्रकरणानंतर बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचा कायदा करण्यात आला आहे. आरोपीने तीन वर्षांच्या मुलीसोबत केले कृत्य केलेलं, हे कृत्य अतिशय निर्दयी होतं आणि त्यामुळे समाज मनावर गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत. या घटनेनंतर कुटुंबीयांचा कायद्यावरील विश्ववास उडाल्याची परिस्थिती होती, त्यांनी मुंबई बंगळूर हायवे रोखून धरला होता आणि आरोपीला त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली एवढी ही गंभीर घटना आहे.

हेदेखील वाचा

Comments are closed.