MIM नं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले.
मुंबई : असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमनं महाराष्ट्रात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत 125 जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमनं मुंबई महापालिका निवडणुकीत 227 पैकी 8 जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मुंबई महापालिकेत एमआयएमचे गटनेते म्हणून विजय तातोबा उबाळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. विजय उबाळे यांच्या गटनेते म्हणून झालेल्या निवडीबद्दल पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अभिनंदन करत पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय उबाळे एमआयएचे गटनेते
मुंबई महापालिका निवडणुकीत एमआयएनं 8 जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, मनसे यांच्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत गटनेता निवडीबाबत घोषणा केली आहे. एमआयएमच्या नगरसेवकांनी गटनेते म्हणून विजय तातोबा उबाळे यांची निवड केल्याचं जलील यांनी सांगितलं. तर, प्रभाग समितीवर खैरुन्निसा आणि स्थायी समितीवर जमीर कुरेशी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
कोण आहेत विजय उबाळे?
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमनं राज्यात पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत 13 महापालिकांमध्ये 125 जागांवर विजय मिळवला. मुंबई महापालिकेत एमआयएमनं 8 जागांवर विजय मिळवला. समाजवादी पक्षाला धक्का देत एमआयएमनं मुंबईत 8 जागा जिंकल्या. या आठ नगरसेवकांपैकी विजय उबाळे यांचा विजय चर्चेत राहिला. विजय उबाळे यांनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षामार्फत मुंबईच्या प्रभाग क्रमांक 140 मधून विजय मिळवला. विजय उबाळे यांच्या गोवंडी प्रभागाचा काही भाग विधानसभेला मानखुर्द शिवाजीनगर आणि अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात आहे. विजय उबाळे यांनी प्रभाग क्रमांक 140 मधील 16 उमेदवारांना पराभूत करून 4,945 मते मिळवली. या प्रभागात एकूण 25, 950 मते पडली, ज्यामध्ये उबाळे यांना 20% मते मिळाली.
विजय उबाळे यांनी सोमय्या कॉलेजमधून बी.एससी. पदवी घेतली आहे आणि ते व्यवसायाने शिक्षक आहेत. ते खाजगी शिकवणी वर्ग देखील चालवतात, ज्यामुळे ते मुले आणि पालकांमध्ये प्रामुख्यानं विजय सर या नावानं ओळखले जातात. प्रभाग क्रमांक 140 चे एआयएमआयएम अध्यक्ष दिलशाद अन्सारी म्हणतात की या प्रभागात हिंदू आणि मुस्लिम मतदारांचे प्रमाण जवळजवळ समान आहे. असे असताना मतदारांनी विश्वास दर्शवत आम्हाला साथ दिली आहे.
च्या सर्व 3 नेत्यांना माझ्या शुभेच्छा आणि शुभेच्छा @aimim_national नगरसेवक, विजय उबाळे साहेबांचे खूप खूप अभिनंदन. https://t.co/LcUZpt2uT9
— असदुद्दीन ओवेसी (@asadowaisi) 21 जानेवारी 2026
राज्यभरातील एमआयएमचे नगरसेवक –
१. सोलापूर – ८
2. संभाजीनगर – 33
3. मालेगाव – 20
4. मुंबई – ८
५. नागपूर – ६
6. अहिल्यानगर – 2
7. जालना – 2
8. ठाणे – ५
९. नांदेड – १५
10. चंद्रपूर – १
11. धुळे – 10
12. अकोला – ३
13. अमरावती – १२
एकूण – 125
आणखी वाचा
Comments are closed.